अनेकांना झोप पूर्ण न झाल्याने होणाऱ्या त्रासांबद्दल माहिती असतं. झोप आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची असते हे डॉक्टरही नेहमी सांगत असतात. जर झोप पूर्ण झाली नाही तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. पाच तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना हृदय विकारा झटका येण्याची अधिक शक्यता असते.
काय म्हणतात अभ्यासक?
स्वीडन येथील यूनिव्हर्सिीटी ऑफ गोथेनबर्गचे मोआ बेंगटसन म्हणाले की, खूप जास्त व्यस्त राहणाऱ्या लोकांसाठी झोपणे वेळ घालवण्यासारखे असू शकते. पण आमच्या अभ्यासानुसार, कमी झोप घेणाऱ्यांना भविष्यात हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता अधिक असते'.
झोप पूर्ण न होण्याची लक्षणे-
१) डायबिटीजचा धोका
१९९३ मध्ये झालेल्या एका अभ्यासात भाग घेण्यासाठी १९४३ मध्ये जन्मलेले आणि गोथेनबर्गमध्ये राहणाऱ्या ५० टक्के पुरुषांच्या लोकसंख्येतून काही लोकांची निवड करण्यात आली होती. या अभ्यासात हे आढळून आले की, रात्री ५ तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ झोपणाऱ्या पुरुषांमध्ये हाय ब्लडप्रेशर, मधुमेह, जाडेपणा, कमी शारीरिक हालचाली ही सामान्य बाब आहे. मोआ म्हणाले की, या अभ्यासातून हे समोर आले की, झोप पूर्ण होणे फार गरजेचे आहे. तसे न झाल्यास सर्वांसाठीच घातक आहे.
२) जाडेपणा
झोप पूर्ण न झाल्याने हार्मोन्स असंतुलित होतात. त्यामुळे व्यक्तीला काही कॅलरी फूड खाण्याची इच्छा होते आणि या पदार्थांमुळे आरोग्य तर बिघडतंच सोबतच वजन वाढण्याची समस्याही वाढते.
३) लैंगिक समस्या
टस्टोस्टेरॉन हार्मोन्समुळे महिला आणि पुरुषांमध्ये शारीरिक संबंध स्थापित करण्याची इच्छा होते. व्यवस्थित झोप घेतल्याने टेस्टोस्टेरॉनची लेव्हल वाढते. पण झोप कमी झाल्याने अनेक लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात.
४) त्वचेसंबंधी समस्या
जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर तुम्हाला त्वचेसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कमी झोपेमुळे त्वचेसंबंधी निर्माण झालेली समस्या लवकर बरीही होत नाही.