Obesity in India : फास्ट फूडची वाढती क्रेझ, अनहेल्दी लाइफस्टाईल, एक्सरसाईज न करणं यामुळे आज जास्तीत जास्त लोक हृदयरोग, डायबिटीस, ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणाचे शिकार होत चालले आहेत. अशात द लॅंसेटचा एक नवा रिपोर्ट समोर आला असून तो भारतीय लोकांची चिंता वाढणारा ठरणार आहे.
या रिपोर्टमध्ये सांगितलं की, २०५० पर्यंत भारतात २५ वयापेक्षा जास्त लठ्ठ असणाऱ्या लोकांची संख्या साधारण ४५ कोटी इतकी होऊ शकते. या रिपोर्टमध्ये चीन सगळ्यात वरच्या स्थानावर आहे, जिथे २०५० पर्यंत ६२ कोटींपेक्षा जास्त लोक लठ्ठपणाचे शिकार होतील. तर अमेरिकेत २१ कोटींपेक्षा जास्त लोक याचे शिकार होतील.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी जर बदलल्या नाही तर जगात २५ वयापेक्षा जास्त वय असलेले ३.८ बिलियन लोक लठ्ठपणाचे शिकार होऊ शकतात. ही आकडेवारी एका अंदाजानुसार, जगातील तरूणांच्या संख्येच्या अर्धी असेल. अशात लठ्ठपणा वाढणं म्हणजे शरीर वेगवेगळ्या आजारांचं घर होणार आणि नंतर मृत्यूंची संख्याही वाढू शकते.
महिला की पुरूष कोण जास्त लठ्ठ होणार?
एका रिपोर्टनुसार, २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, जगात एकूण २.११ बिलियन तरूण लठ्ठपणा आणि अधिक वजन असल्याचे आढळून आले. ज्यात १ बिलियन पुरूष आणि १.११ बिलियन महिला होत्या. यात चीनमध्ये ४०२ मिलियन लोक लठ्ठ आढळले. भारतात १८० मिलियन लोक लठ्ठ आढळले. तर अमेरिकेत १७२ मिलियन लोक लठ्ठपणाचे शिकार दिसले.
या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, चीन, भारत आणि अमेरिकेतील लोकांमध्ये वजन सगळ्यात जास्त वाढलं आहे. इतरही असे देश आहेत जिथे लठ्ठपणा वाढत आहे. त्यात ब्राझील, रशिया, मेक्सिको, इंडोनेशिया आणि इजिप्तसारख्या देशांचा समावेश आहे.
लठ्ठपणाचं मुख्य कारण...
लोकांमध्ये लठ्ठपणा आणि वजन वाढण्याला फास्ट फूड कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलं. फास्ट फूडमुळे लठ्ठपणा वाढणाऱ्या देशांमध्ये भारतासोबतच कॅमरून आणि व्हिएतनामसारख्या तीन देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड आणि ड्रिंक्सची विक्री खूप वाढली आहे. ज्यामुळे लठ्ठपणा वाढत आहे. जर वेळीच या गोष्टी खाणं सोडलं नाही तर जगातील मोठ्या संख्येने लोक गंभीर आजारांचे शिकार होतील.