चीनच्या वुहान शहारातून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे माहामारीचं वातावरण निर्माण झालं आहे. चीन या आजारावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होण्याच्या दिशेने असला तरी लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. काही असे देश आहेत ज्यांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. भारतात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता मार्चपासूनच लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यामुळे या माहामारीवर नियंत्रण ठेवता आलं आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यू होत असलेल्यांची संख्या कमी आहे. याबाबत अमेरिकेतील सीडीसी (Centers for Disease Control and Prevention) ने दावा केला आहे.
सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार जगभरातील कोरोनाचं संक्रमण पाहता मृतांचा आकडा कमी आहे. यामागील कारणं स्पष्ट करण्यात आली आहेत. संपूर्ण जगभरातील कोरोना रुग्णांची आणि मृतांची माहिती मिळाल्यानंतर करण्यात आलेल्या रिसर्चनुसार कोरोनाबाधित आणि मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येत खूप तफावत आहे. कोरोनाचे उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा वापर केला जात आहे. त्यामुळे रुग्णांना वाचवण्यात यश येत आहे.
याशिवाय लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचा आकडा कमी आहे. त्यात शरीरात पसरलेलं संक्रमण जास्त गंभीर नसते. योग्यवेळी उपचार केल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. विशेषतः संपूर्ण जगभरात कोरोनाच्या संक्रमणामुळे मृत्यू होत असलेल्यांमध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोक जास्त आहेत. ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत आहे अशा लोकांचा मृतांमध्ये समावेश आहे. दीर्घकाळापर्यंत ज्या रुग्णांवर योग्य उपचार पद्धतींचा वापर करण्यात आला नाही अशा रुग्णांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. काही ठिकाणी २० ते ३० वयोगटातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाला आहे.
आधीच कोणत्याही आजारानेग्रस्त असलेल्यांची संख्या जास्त
अंडरलाइंग डिसीज म्हणजेच हृदयरोग, डायबिटीस, ब्लड प्रेशर, कॅन्सर या आजारांचा सामना करत असलेल्या रुग्णांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचं शिकार व्हावं लागलं. कोरोना व्हायरस जगभरात आपले पाय पसरत असताना सीडीसी कडून याबाबत माहिती देण्यात आली होती. सीडीसीनीने आपल्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार. जे कोणत्याही प्रकारच्या आजाराने ग्रासलेले आहेत त्यांना मृत्यूचा धोका जास्त आहे. अशा लोकांनी कोरोनाच्या संक्रमणापासून बचावासाठी पूरेपुर प्रयत्न करणं गरजेचं आहे.
आशेचा किरण! आता 'या' सेल्सची संख्या वाढवून कोरोनावर करता येणार मात, तज्ज्ञांचा दावा
CoronaVirus News : हँड सॅनिटायझर एक्सपायरी डेट संपल्यावरही व्हायरसचा नाश करतं का?