शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

खळखळुन हसा अन् घालवा राग... वाचा लाफिंग थेरपीच्या साध्या सोप्या टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 2:30 PM

यासाठी रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी हास्य थेरपीचा तुम्ही उपयोग करू शकता. हसण्याने राग चटकन दुर होतो.

प्रत्येकाला राग हा येतोच. मात्र रागावर नियंत्रण ठेवणं सर्वांनाच जमतं असं नाही. काही लोक पटकन रागावतात आणि लवकर शांतही होतात. काहींचा राग मात्र लवकर शांत होणं कठीण असतं. राग अनावर झाला की त्या माणसाचा चेहरा लाल होतो, अंगाचा थरकाप उडतो, बोलण्यावर नियंत्रण राहत नाही. या सर्व गोष्टींमुळे रक्तदाबामध्ये झटकन बदल होतो. ज्याच्या परिणाम तुमच्या शरीर आणि मन स्वास्थावर होऊ शकतो. शिवाय रागाच्या भरात अशी माणसं नको ते निर्णय घेतात. ज्यामुळे शेवटी त्याच व्यक्तीचं नुकसान होऊ शकतं. अती रागामुळे माणसं नैराश्याच्या अधीन गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. यासाठी रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी हास्य थेरपीचा तुम्ही उपयोग करू शकता. हसण्याने राग चटकन दुर होतो. राग घालवण्यासाठी हास्याचा उपयोग कसा करावा हे डॉ. नेहा आनंद यांनी ओन्लीमायहेल्थ या वेबसाईटला सांगितले आहे.एक्सप्रेशन्स बदलातुम्हाला राग येत असेल तर तुमचे एक्सप्रेशन्स बदला. चेहऱ्यावर हास्य ठेवण्याचा प्रयत्न करा. हे करणं कठीण आहे. तुम्ही म्हणाल की राग आल्यावर हसायचे कसे तर हे तुम्हाला सवयीने जमेल.

हसण्याजोग्या गोष्टी आजूबाजूला ठेवणेतुम्हाला राग आला असेल तेव्हा आजूबाजूला हसु येईल अशा गोष्टी ठेवा. तुम्ही लाफ्टर शो बघु शकता किंवा मित्रांसोबत फोनवर बोलू शकता. जुन्या हास्यास्पद आठवणी किंवा जोक्स आठवू शकता.

हास्यास्पद घटना आठवातुम्हाला राग येत असेल तर हास्यास्पद घटनांची आठवण करा. अशावेळी इतरांनी राग येणाऱ्या व्यक्तीची मस्करी करू नका. त्यामुळे जास्त राग येतो. त्याऐवजी त्याला जोक्स किंवा हास्यस्पद घटना सांगा.

हास्य योग करारागावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही हास्य योग करू शकता. यासाठी रिलॅक्स पोजिशनमध्ये बसा आणि जोरजोरात हसा. बघा रागावर नियंत्रण मिळवण्यास खुप फायदा होईल.

माईंडफुलनेस मेडिटेशन करारागाला आवर घालण्यासाठी माईंडफुलनेस मेडिटेशन करा. शांत बसून मेडिटेशन करताना चांगल्या आठवणी आठवा. तुमचं मन अगदी शांत होईल आणि रागावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स