कोरोना व्हारसच्या संक्रमणावर अभ्यास करत असलेल्या प्रमुख वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरस हा पुढील तीन वर्षांपर्यंत राहू शकतो. अशी धोक्याची सुचना दिली आहे. जर्मनीचे वायरोलॉजिस्ट हेन्ड्रिक स्ट्रीक यांनी सांगितले की, येत्या काळात कोरोना संक्रमणात वाढ होणार असून या माहामारीला टाळणं कठीण होणार आहे. म्हणून लोकांनी या संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहायला हवं.
जर्मनीचे प्रमुख वायरोलॉजिस्ट आणि इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीचे अँण्ड एचआईवी रिसर्चचे प्रमुख हेन्ड्रिक स्ट्रीक यांनी सांगितले की, कोरोना लसीबाबत कोणतीही शाश्वती आता देण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकांनी आपल्या जीवनशैलीत बदल करून घेण्याची तयारी ठेवायला हवी. कारण ही कोरोनाची लढाई २०२३ पर्यंत अशीच सुरू राहणार आहे.
जर्मनीमध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचा हाहाकार पसरलेल्या हेन्सबर्गमध्ये हेन्ड्रिक स्ट्रीक यांच्या मदतीनं स्थानिक सरकारनं अनेक पाऊलं उचलली आहेत. स्ट्रीक यांच्या टीमनं जर्मनीमध्ये कोरोना व्हायरसबाबत अभ्यास केला आहे. कोरोना व्हायरस कसा पसरतो तसंच कोरोनाला रोखण्यासाठी काय करायला हवं यासाठी संशोधन सुरू आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, घरगुती कार्यक्रम, पार्टीजवर बंदी घातल्यास व्हायरसच्या संक्रमणाचा वेग कमी करता येऊ शकतो.
हेन्ड्रिक स्ट्रीक यांनी सांगितले की, हा व्हायरस पूर्णपणे निघून जाणं अशक्य आहे. कोरोना आता लोकांच्या रोजच्या जगण्यातील एक भाग झाला आहे. पुढील तीन वर्षांपर्यंत कोरोना विषाणू सोबत राहणार आहे. त्यामुळे कोरोना सोबत जगण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करावा लागेल. तज्ज्ञ स्ट्रीक यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हायरस वेगानं पसरण्यासाठी कारणीभूत असलेल्या घटनांवर नियंत्रण ठेवायला हवं.
जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येणं टाळायला हवं. यांनी सांगितले की एका कार्निव्हल सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेले ४४ टक्के लोक कोरोना पॉजिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंगचे नियम पाळल्यानं आणि सार्वजनिक ठिकाणी जाण्याचं टाळल्यानं कोरोना प्रसाराला रोखता येऊ शकतं.
हृदयरोग, कॅन्सर आणि डायबिटीसमुळे दरवर्षी होतात ४ कोटींपेक्षा अधिक मृत्यू; WHO चा दावा
जागतिक आरोग्य संघटनेनं विविध देशांतील सरकारला कॅन्सर, डायबिटीस, नॉन कम्यूनिकेबल आजारांच्या रुग्णांच्या उपचारांसाठी प्राथमिकता देण्याचे आवाहन केले आहे. WHO नं दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी या आजारानं ४ कोटींपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. कोरोनाच्या माहामारीचा सामना करत असताना इतर आजारांच्या उपचारांकडे दुर्लक्ष होणं घातक ठरू शकतं. सध्या जगभरात १० पैकी ७ लोकांचे मृत्यू कॅन्सर, डायबिटिस आणि हृदयाच्या विकारांमुळे होत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख एडहेनॉम घेबरीएसेस यांनी दिलेल्या माहितीनुसार आधीपासूनच गंभीर आजारांनी बाधित असलेल्या लोकांसाठी कोरोना विषाणू घातक ठरू शकतो. यात तरूणांचाही समावेश आहे. कॅन्सर, डायबिटीस, डायबिटीस नॉन कम्यूनिकेबल आजारांच्या जाळ्यात अडकून दरवर्षी ४ कोटींपेक्षा अधिक लोकांना मृत्यूचा सामना करावा लागतो. WHO च्या रिसर्चनुसार कोरोनाच्या माहामारीमुळे इतर आजारांवर उपचार घेत असलेल्या लोकांच्या उपचार पद्धतीत ६९ टक्क्यांनी फरक पडला आहे. नॉन कम्यूनिकेबल आजारांमुळे कोरोनाचं संक्रमण होण्याचा आणि त्यामुळे मुत्यू होण्याचा धोका जास्त आहे.
हे पण वाचा-
हृदयरोग, कॅन्सर आणि डायबिटीसमुळे दरवर्षी होतात ४ कोटींपेक्षा अधिक मृत्यू; WHO चा दावा
रडावंस वाटत असेल तर मनमोकळेपणानं रडा; अश्रूंना रोखल्यानं आरोग्यावर 'असा' होतो परिणाम
लढ्याला यश! झाडांमधील रासायनिक तत्वाने कोरोना विषाणू नष्ट होणार; भारतीय तज्ज्ञांचा दावा