शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

लिंबू, संत्री, आवळ्याने बरा होतो प्रदूषित कर्करोग, त्वचारोग....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 5:52 PM

शंख, शिंपल्यावर यशस्वी प्रयोग : अमरावती विद्यापीठात शरद महाजन यांचा शोधनिबंध

गणेश वासनिक

अमरावती : जमिनीतील जाड धातूयुक्त आणि अति प्रदूषित पाणी मुनष्याला प्यावे लागत असल्याने शरीरावर आघात होते. मात्र, जीवनसत्व 'क'चा मनुष्याच्या शरीरात पुरवठा झाल्यास कर्करोग, तत्वारोग व रक्ताक्षय अशा जीवघेणी आजारापासून मुक्ती मिळेल, असा शोधनिबंध ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील के. वि. पेंढरकर महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक शरद महाजन यांनी सादर केला आहे. 

'गोड्या पाण्यातील शिंपल्याच्या पचनग्रंथीत होणाऱ्या 'आर्सेनिकॉसीस' या सदोषावर जीवनसत्व 'क' उपायात्मक भूमिका या विषयावरील त्यांच्या शोध प्रबंधाला अमरावती विद्यापीठाने द्वितीय क्रमांकाने गौरविले आहे. केंद्रीय अनुदान आयोग, प्राणीशास्त्र विभाग व आयक्यूसी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 22 व 23 जानेवारी रोजी प्राणीशास्त्रावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. यावेळी शरद महाजन यांनी पश्चिम बंगाल, यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुका हा भारतातील 'आर्सेनिक बेल्ट' असल्याचे भूगर्भशास्त्राचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. 

काही वर्षांपासून पर्जन्यमान कमी होत आहे. कुपनलिकेतून अनियंत्रित पाण्याचा उपसा वाढला आहे. भूजलस्तर खोलवर गेले आणि गढूळ पाणी मनुष्याला प्यावे लागत आहे. कीटकनाशकांचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर वाढला आहे. वाढत्या लोकसंख्येने प्रदूषण पातळी उंचावली आहे. त्यामुळे जमिनीतील जड धातूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गढूळ, क्षारयुक्त आणि अतिप्रदूषित पाण्यामुळे शंख, शिंपल्याच्या जीवनावर झालेला परिणामावर महाजन यांनी यशस्वी प्रयोग केला. प्रदूषणाने झालेले कर्करोग, त्वचारोग आणि रक्ताशयावर 'क' जीवनसत्वाने मात करता येते. जाड धातूयुक्त, अतिप्रदूषित पाण्यामुळे शिंपल्यावर परिणाम झाला. तेच निकष मानवालादेखील लागू होते, हे त्यांनी शोधप्रबंधात मांडले आहे. 'क' जीवनसत्व पाण्यामध्ये द्रावणीय अवस्थेत ऋण आयर्न तयार करतात. त्याचा संयोग होऊन धातूंच्या धनमुलकांशी संयोग होऊन उदासिनीकरण होते. तो क्षार मुत्राकडे उत्सर्जित केला जातो. त्यामुळे धातूंचा शरीरावर होणारा विपरीत परिणाम टाळता येतो. धातू प्रदूषणाचा मनुष्याच्या शरीरावर आघात झाल्यास 'क' जीवनसत्व असलेले लिंबू, संत्री, आवळा सेवन केल्यास कर्करोग, त्वचारोग, रक्ताशय असे आजार टाळता येते. मनुष्य, गिनी पिग्ज आणि माकडवर्गीय प्राण्यांमध्ये जीवनसत्व 'क' होऊ शकत नाही. त्यामुळे आहारात दररोज 10 ते 20 मिली ग्रॅम इतकेच किंवा त्यापेक्षा 'क' जीवनसत्वाचे सेवन झाल्यास 'स्कर्व्ही' या विकाराबरोबरच इतर शरीर प्रक्रियांवर ताण पडतो. पाणी उकळून प्यायल्याने रोगजीव मरतात. मात्र, त्यातील क्षाराची मुख्यत: धातूच्या क्षारांची मात्रा कमी होत नसते, ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. 'क' जीवनसत्व पाण्यामध्ये द्रावणीय अवस्थेत ऋण आयर्न तयार करतात व त्याचा संयोग होऊन धातुंच्या धनमुलकांशी संयोग होऊन उदासिनीकरण होते. तो क्षार मुत्राकडे उत्सर्जित केला जातो. त्यामुळे धातूंचा शरीरावर होणारा विपरीत परिणाम टाळता येतो. महाजन यांनी शोधप्रबंधात पूर्वप्रतिरक्षात्मक व उपचारात्मक असे दोनही प्रकारे सकारात्मक परिणाम धातू प्रदूषणाच्या प्रति मिळालेले दिसून येतात. या शोधप्रबंधासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील सुरेशचंद्र झांबरे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

अशा कराव्यात उपाययोजना :

- विहिरींची जलपातळी खोलवर जात असल्याने वर्षाकाठी प्रयोगशाळेतून जलपरिक्षण करावे

- कूपनलिकेची खोली वाढविण्यासाठी पावसाळ्यात नवतंत्रज्ञानाने पुर्नजिवीत करणे

- लिंबू किंवा लिंबूवर्गीय फळे सेवन करणे. उदा. संत्रा, लिंबू, आवळा, देशी चिंच, आमसूल, पेरू आदी

- डबाबंद अन्न, मासे किंवा औषधे जास्त दिवस घरात साठवून ठेवू नये

'गोड पाण्यातील शिंपल्याच्या पचनग्रंथीत होणाऱ्या 'आर्सेनिकॉसीस' या सदोषावर जीवनसत्व 'क' उपायात्मक भूमिका या विषयावरील शोधप्रबंधाला दुसरा क्रमांकाने गौरविले आहे. आवळा, लिंबू, पेरू, संत्राज्यूस सेवन केल्यास विविध रोगावर मात शक्य आहे, हे शरद महाजन यांच्या शोधनिबंधातून सिद्ध होते.

- एच.पी. नांदूरकर,प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारAmravatiअमरावती