थंडीच्या दिवसात अनेकजण पाणी पितात. मात्र कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनसोबतच संक्रमणाचा धोकाही वाढतो. ही संक्रमण महिलांमध्ये अधिक प्रमाणात बघायला मिळतं. पण तसंही पाणी कमी पिणे पुरुष आणि महिला दोघांसाठीही हानिकारक ठरु शकतं. पाणी कमी प्यायल्याने सिस्टायटिस हे संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. सिस्टायटिस हे एकप्रकारचं इन्फेक्शन आहे जे लघवीच्या मार्गात अडसर निर्माण करतं. यामुळे ब्लॅडर वॉलमध्ये सूज येते. तसा हा काही फार गंभीर आजार नाहीये. पण याने लघवीच्या मार्गात जळजळ आणि वेदना होऊ शकतात. सिस्टायटिस संक्रमण हे सामान्यपणे बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे होतं.
महिलांमध्ये सिस्टायटिसचा धोका अधिक असतो. कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांचं यूरिनरी ब्लॅडर म्हणजेचे मुत्राशय आकाराने लहान असतं. पण याचा अर्थ हा नाही की, पुरुषांना हे संक्रमण होत नाही. महिलांमध्ये गर्भवस्थेत हे संक्रमण होण्याचा धोका अधिक वाढतो.
काय आहेत कारणे?
सिस्टायटिस संक्रमण होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पण सामान्यपणे पाणी कमी प्यायल्याने हे संक्रमण होण्याचा धोका अधिक वाढतो. शरीरात पाणी कमी असल्याने शरीरातील विषारी तत्व पूर्णपणे बाहेर येऊ शकत नाहीत. याच विषारी तत्वांमुळे पोटात बॅक्टेरिया तयार होतात, जे मुत्राशयात पोहोचून संक्रमणाचं कारण ठरतात. त्यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचं संक्रमण झाल्यास तरल पदार्थांच सेवन सुरु करायला हवं.
सिस्टायटिसची लक्षणे
- लघवी करताना जळजळ आणि वेदना होणे- लघवीसोबत रक्तही निघणे- लघवीतून दुर्गंधी येणे - कंबरेच्या खालच्या भागात वेदना होणे- सतत लघवी लागल्यासारखे वाटणे- वयोवृद्ध लोकांना थकवा आणि ताप येणे- सतत लघवी लागणे पण लघवी कमी होणे
कसा कराल बचाव?
सिस्टायटिस हा गंभीर आजार नाहीये. त्यामुळे याला घाबरण्याचं कारण नाही. सामान्यपणे आवश्यक ती काळजी घेतली तर ३ ते ४ दिवसात तुम्ही ठीक होऊ शकता. पण जर ही समस्या ४ दिवसात दूर झाली नाही तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सिस्टायटिसपासून बचाव करण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे फायदेशीर ठरतं.
सिस्टायटिस दरम्यान स्वच्छतेची काळजी घ्यावी. सिस्टाटिस संक्रमण झाल्यास तरल पदार्थांचं सेवन करा आणि जास्तीत जास्त पाणी प्यावे. कॅफीन असलेले कोल्ड्रींक्स आणि कोल्ड ड्रिंक्सचं सेवन बंद करा. मद्यसेवन आणि धुम्रपानही बंद करावे.