शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जीवनशैलीमुळे लहानग्यांमध्ये स्थूलतेची समस्या वाढतेय; ‘रेडी टू इट’सह जंकफूडच्या अतिवापराचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 5:33 AM

वैद्यकीय तज्ज्ञांचे मत, मुलांना जेव्हा धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी लक्षणे दिसू लागल्यानंतरच बरेचदा पालक डॉक्टरांकडे धाव घेतात :

मुंबई :  मागील वर्षभरात लहान मुलांची बदललेली जीवनशैली, आहार आणि दिनक्रम यामुळे आरोग्यावर विपरित होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनामुळे शाळा, मैदानी खेळ बंद त्यात बैठ्या जीवनशैली आणि शिथिलतेमुळे लहानग्यांमुळे स्थूलतेची समस्या वाढते आहे. आता ग्रामीण भागांतही नोंद घेण्याइतपत दिसून येत आहे. जंकफूड किंवा बंद पाकिटातील ‘रेडी टू ईट’ पदार्थाचे सेवन, कमीत कमी शारीरिक हालचाल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा अतिवापर यासाठी प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.

मुलांना जेव्हा धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी लक्षणे दिसू लागल्यानंतरच बरेचदा पालक डॉक्टरांकडे धाव घेतात. मुलाचे वय आणि उंचीच्या गुणोत्तरानुसार आवश्यक वजनापेक्षा साधारण १० ते १५ किलो वजन अधिक असणे म्हणजे मूल स्थूलतेकडे झुकत आहे, असे म्हणता येईल. घरी बसल्या बसल्याही हालचाली संथ होणे, मैदानी खेळ न खेळणे, वजन सतत वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे ही साधारण लक्षणे मुलांमध्ये दिसून येत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी माहिती बेरिएट्रीक सर्जन डॉ. मिथिला शहा यांनी दिली आहे.

सर्वसाधारणपणे मुलांमधील स्थूलतेचे दोन भाग असतात. दहा वर्षांखालील मुलांना शक्यतो आनुवंशिकरीत्या लठ्ठपणा आलेला असतो, तर त्यावरील मुलांमध्ये मुख्यत्वे खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैली यामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणावर नियंत्रण आणण्यासाठी कोणतीही औषधे उपलब्ध नाहीत. आहारावरील नियंत्रण आणि व्यायाम या मार्गानेच वजन कमी करता येते. पौगंडावस्थेपर्यंत मुलांमध्ये शरीराचा विकास होत असतो. हार्मोन्सचे बदल घडत असतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये शक्यतो बॅरियाटिक शस्त्रक्रिया करणे टाळले जाते. अशा बालकांमध्ये लठ्ठपणा कमी करण्यासाठी शक्यतो आहार आणि व्यायामावरच भर दिला जातो. लठ्ठपणावर उपचार करण्यापूर्वी त्याचे योग्य निदान करणे आवश्यक आहे, अशी माहिती डॉ. शहा यांनी दिली.

हे करा !लहान मुलांमधला लठ्ठपणा टाळण्यासाठी सर्वप्रथम त्यांना मैदानावर खेळण्यास आणि नियमित व्यायाम करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यायला हवे. पोहणे आणि सायकलिंगसारखे व्यायाम निश्चितच लाभदायक ठरू शकतात. याशिवाय आहारावर नियंत्रण असले पाहिजे. फास्ट फूड खाण्यावर नियंत्रण आणले पाहिजे. तसेच आहार हा सर्वसमावेशक असावा. शीतपेयांची सवय मुलांना लावू नये. आहार आणि निद्रा यांचा समतोल असायला हवा. हॉर्मोन्समुळे लठ्ठपणा वाढत असेल, तर तातडीने एंडोक्रिनोलॉजिस्टचा (हॉर्मोनविशेषज्ञ) सल्ला घ्यावा. सध्या लठ्ठपणा हा एक विकार म्हणून समोर येत आहे. त्यामुळे जीवनशैलीशी संबंधित आजार, मधुमेह, हृदयरोग, उच्चरक्तदाब यांचे प्रमाण कमी वयातच वाढते आहे. ही धोकादायक बाब असून, लठ्ठपणावर वेळीच नियंत्रण मिळवले, तर त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून बचाव करता येईल.

लठ्ठपणा टाळण्यासाठी हे करू नका !सातत्याने जंकफूड खाणे, मोबाइल, व्हिडिओ गेम यांमुळे कमीत कमी शारीरिक हालचाल यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत जातो. दहा वर्षांवरील मुलांमध्ये दिसून येणारा हा लठ्ठपणा वेळीच लक्षात आल्यास आहार किंवा व्यायामाच्या माध्यमातून नियंत्रित केला जातो. परंतु वजन प्रमाणाबाहेर वाढल्यास किंवा आरोग्यास धोका निर्माण झाल्यास मात्र शस्त्रक्रिया करणे भाग असते. तोंडाला पाणी सुटणारे जंकफूडचे पदार्थ अवतीभवती दिसत असताना त्यापासून त्यांना दूर ठेवणे अशक्य आहे. तेव्हा आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा कुटुंबासह असे पदार्थ खाण्यास हरकत नाही.

साखर, गूळ याचा अतिवापर नको

बाळाला सहा महिन्यांपर्यंत फक्त स्तनपान दिल्यानेही स्थूलता रोखण्यास मदत होते. मुलाला दुधाव्यतिरिक्त आहार सुरू केल्यानंतर पूर्णत: घरी तयार केलेले पदार्थच द्यावेत. यामध्ये मग दुधातले नाचणीचे सत्त्व, तांदूळ-मुगाच्या डाळीची खिचडी, बटाट्याची फोड असे हलके पदार्थ द्यायला हरकत नाही. विविध फ्लेवरसह सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या डबाबंद पावडर आणून घरी बनवून देणे टाळणेच उत्तम, दुधात बिस्किटे देऊ  नयेत. साखर किंवा गूळ याचा अतिवापर नसलेले पदार्थ शक्यतो द्यावेत. - डॉ. शिल्पा यादव, आहारतज्ज्ञ