केवळ व्यायाम केल्याने तुमच्या पोटाची चरबी कमी होत नाही. ट्रेडमिलवर तासनतास धावल्यावर तसंच भरपूर घाम गाळल्याने तुमचं वजन कमी होईल परंतु तुमच्या पोटाची चरबी कमी होईलच असं नाही.
मुळात बेली फॅट कमी करण्यासाठी खूप मेहनत करत असाल, परंतु कोणताही परिणाम दिसून येत नसेल, तर तुम्ही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. अशा परिस्थितीत तुम्हाला जीवनशैलीकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही जीवनशैलीतील अशा काही चुका करत असाल ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होत नाही.
अनहेल्दी डाएटअनहेल्दी डाएटमुळे पोटाची चरबी वाढण्यास मदत होते. स्टार्च कार्बोहायड्रेट्स आणि खराब कोलेस्टेरॉलने भरपूर अन्न घेतल्याने तुमचे शरीर वाढतं. म्हणून, तुम्ही तुमच्या खाण्याची पद्धत बदलली पाहिजे. यावेळी तुमच्या रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, प्रथिनं आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत.
धुम्रपानसध्याची तरूणाई धूम्रपानाच्या आहारी गेली आहे. या वाईट सवयीमुळे तुमच्या पोट आणि आतड्यांवरील चरबी वाढते. म्हणून, जर तुम्हाला बेली फॅट कमी करायचं असेल तर लगेच धूम्रपान करणं थांबवा.
तणावदररोजच्या ताणतणावाचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते तेव्हा बेटी फॅट वाढू लागतं. तुमची तणावाची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही ध्यान, योगा करू शकता.
पाण्याचं कमी प्रमाणात सेवनबर्याच संशोधनातून असं दिसून आलं आहे की, पुरेसं पाणी प्यायल्याने तुमचं वजन कमी होण्यास आणि पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. पण जेव्हा तुम्ही पाणी पीत नाही, तेव्हा त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शक्य तितकं पाणी प्या जेणेकरून पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.