- मयूर पठाडेटेन्शन घेऊ नका आणि अर्थातच त्यामुळे दुसºयाला देऊ नका, स्वत:साठी किमान थोडा तरी वेळ मोकळा ठेवा, एकाच वेळी अनेक गोष्टींच्या मागे धाऊ नका, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा ठेऊ नका आणि त्यासाठी वारेमाप धाऊ नका.. त्यामुळे तुम्हाला टेन्शन येईल, हेच टेन्शन तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर ठेवील.. असं आपण कायम ऐकत आलोय..ते खरंही आहे, पण अर्धसत्य. तुम्हाला टेन्शन नको, अति टेन्शन नको, हे बरोबरच आहे, पण जर तुम्हाला काहीच टेन्शन नाही, कुठलीच चिंता नाही, असं जर असलं तर तुमच्याकडून काहीच भरीव होणार नाही, तुम्ही एका टप्प्याच्या फारसं पुढेही जाणार नाही, हेदेखील खरं आहे.त्यासाठी तुम्हाला थोडं तरी टेन्शन हवं. हे टेन्शन तुमच्यासाठी प्राणवायूसारखं काम करील. ते तुम्हाला कायम कार्यरत तर ठेवीलच, पण तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, त्या दिशेनं एक पाऊल पुढे जाण्यासाठी कायम प्रेरणा देत राहील. एवढंच नाही, हेच टेन्शन तुमच्या आरोग्यासाठीदेखील चांगलं आहे. अर्थातच हे टेन्शन मात्र मर्यादित स्वरुपात हवं. तसं असलं तरच ते तुमच्यासाठी प्रेरणा म्हणून काम करील. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात टेन्शनच्या पॉझिटिव्ह मुद्यांवर भर देण्यात आला आहे. त्यात वरील सर्व मुद्यांचा अतंर्भाव करण्यात आला आहे. टेन्शनमुळे आपल्या पेशीही कार्यरत होतात आणि त्या अधिक जोमानं काम करायला लागतात. याशिवाय थोडं टेन्शन असलं तर ते तुम्हाला म्हातारपणापासूनही दूर ठेवतं. हृदयासाठी टेन्शन ही अतिशय धोकादायक बाब मानली जाते, पण मर्यादित टेन्शन तुम्हाला हृदयविकारापासूनही लांब ठेवतं, तुमच्या हृदयाची क्षमता वाढवतं, असं हे संशोधन सांगतं. नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं असून प्रसिद्ध जर्नल सेल रिपोर्ट्समध्ये या संशोेधनाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
थोडंस टेन्शन असूच द्या तुमच्याजवळ, तुमचं म्हातारपण त्यामुळे लांब पळेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 3:54 PM
तुमचं हृदयही त्यामुळे होईल बळकट..
ठळक मुद्देतुम्हाला थोडं तरी टेन्शन हवं. हे टेन्शन तुमच्यासाठी प्राणवायूसारखं काम करील.ते तुम्हाला कायक कार्यरत तर ठेवीलच, पण तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, त्या दिशेनं एक पाऊल पुढे जाण्यासाठी कायम प्रेरणा देत राहील.मर्यादित टेन्शनमुळे आपल्या पेशीही कार्यरत होतात आणि त्या अधिक जोमानं काम करायला लागतात.