अलिकडे आरोग्यासंबंधी अशा अनेक घटना समोर आल्या ज्या हैराण करणाऱ्या होत्या. कुणाच्या पोटातून लोखंडी खिळे, पिना, नाणी काढण्यात आल्या तर कुणाच्या कुणाच्या नाकातून बंदुकीची गोळी काढण्यात आली. बरं या लोकांना अनेक वर्ष याचा त्रास झाला नाही. ते सामान्य पोटदुखी म्हणून यांकडे दुर्लक्ष करत होते. अशीच एक घटना व्हिएतनाममधून समोर आली आहे. येथील क्वांग निन्ह प्रांतात राहणाऱ्या 34 वर्षीय व्यक्तीसोबत फारच अजब घटना घडली. पोटात वेदना होत असल्याने तो डॉक्टरांकडे गेला. त्याचा एक्स-रे आणि अल्ट्रासाउंड केल्यानंतर समजलं की, एक वस्तू त्याच्या आतड्यांमध्ये छिद्र करून पोटात शिरली आहे. जी बघून डॉक्टरही हैराण झाले.
डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, त्याच्या पोटात काहीतरी शिरल्यामुळे त्याला पेरिटोनिटिस नावाचा गंभीर आजार झाला होता. ज्यामुळे पोटाच्या आत सूज येते. अशात डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन करण्याचं ठरवलं आणि तेव्हा त्यांना पोटात जे दिसलं ते पाहून त्यांनाही धक्का बसला. सोबतच ते विचारातही पडले. कारण त्यांना या व्यक्तीच्या पोटात एक जिवंत मासा सापडला. हा मासा 20 सेंटीमीटर लांब होता.
पोटात कसा शिरला मासा?
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर की, हा मासा त्याच्या पोटात कसा गेला? तर डॉक्टरांनी सांगितलं की, हा मासा कसातरी या व्यक्तीच्या गुदद्वारातून त्याच्या शरीरात शिरला आणि आतड्यांपर्यंत पोहोचला. सुदैवाने ऑपरेशन यशस्वी ठरले आणि व्यक्तीचा जीव वाचला.
या व्यक्तीला पेरिटोनिटिस होण्याचं हे एक अजब कारण आहे. पण हा एक गंभीर आजार आहे आणि याची अजूनही काही कारणे असू शकतात. डॉक्टर सांगतात की, ही एक जीवघेणी समस्या आहे. याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. अशात हा आजार काय आहे हे आपल्या माहीत असलं पाहिजे.
पेरिटोनिटिस समस्या काय आहे?
hopkinsmedicine नुसार, पेरिटोनिटिसमध्ये पोटाला लागून असलेल्या कोशिकांमध्ये सूज आहे. त्या कोशिकांना पेरिटोनियम म्हटलं जातं. हा एक गंभीर जीवघेणा आजार आहे.
पेरिटोनिटिसची कारणे?
पेरिटोनिटिस एक संक्रमणामुळे होतं. बॅक्टेरिया पोटातील एका छिद्रातून पोटात प्रवेश करू शकतात. सामान्यपणे असं तेव्हा होतं जेव्हा आतड्यांमध्ये छिद्र होतं किंवा अपेंडिक्स फाटलेलं असतं.
कारणे
तुमच्या पोट, आतड्या, पित्ताशय, गर्भाशय किंवा मूत्राशयात छिद्र असल्याने किंवा किडनीचा एखादा गंभीर आजार झाल्यावर वा डायलिसिस दरम्यान इन्फेक्शन झाल्याने, पोटात तरल पदार्थांच संक्रमण, ऑपरेशनदरम्यान पोटात बॅक्टेरिया गेल्याने ही समस्या होऊ शकतो.
पेरिटोनिटिसची लक्षणे
ही समस्या झाल्यावर प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी लक्षण दिसू शकतात.
पोटात जोरात वेदना होणे
मळमळ किंवा उलटी
ताप
पोटात वेदनेसोबत सूज
पोटात तरल पदार्थ
पोट साफ होण्यास किंवा गॅस पास होण्यास समस्या
लघवी कमी येणे
तहान लागणे
श्वास घेण्यास समस्या
लो ब्लड प्रेशर