Liver Cancer: तुम्ही जर किचनमध्ये भांडी घासण्यासाठी डिटर्जेंटचा वापर करत असाल तर ते पाण्याने चांगल्याप्रकारे धुण्यास विसरू नका. हे डिटर्जेंट तुम्हाला फार अडचणीत आणू शकतं. रिपोर्टनुसार, डिटर्जेंटमध्ये हानिकारक केमिकल असतात. जे पोटात जाऊन लिव्हर कॅन्सरचं कारण बनू शकतं. मेडिकल एक्सपर्ट सांगतात की, लोकांच्या शरीरात कॅन्सर किचनमधून पोहोचत आहे. त्यामुळे त्यापासून सावध राहिलं पाहिजे.
भांडी घासताना वागू नका बेजबाबदार
'द सन' च्या रिपोर्टनुसार, जे लोक किचनमध्ये भांडी घासताना निष्काळजीपणा करतात, त्यांना कॅन्सरचा धोका चौपट होऊ शकतो. वैज्ञानिकांनी सांगितलं की, ज्या साबणाचा किंवा डिटर्जेंटचा वापर तुम्ही भांडी घासण्यासाठी करता, ते लावून झाल्यावर भांडी काळजीपूर्वक धुणं फार महत्वाचं आहे. असं केलं नाही तर भांड्यांवर साबणाचे किंवा डिटर्जेंटचे कण शिल्लक राहतात. अशात यात भांड्यांमध्ये जेवण केलं किंवा पाणी प्यायलं तर ते कण आपल्या शरीरात जातात. ते लिव्हरपर्यंत पोहोचतात ज्याने शरीराला मोठं नुकसान होतं.
लिव्हर कॅन्सरच्या वाढत आहेत केसेस
लिव्हर कॅन्सरवर रिसर्च करणारे Dr Jesse Goodrich यांच्यानुसार, त्यांनी रिसर्च पुढे नेण्यासाठी 100 लोकांची निवड केली. त्यातील 50 असे लोक होते ज्यांना लिव्हर कॅन्सरची समस्या होती आणि 50 लोकांनी अशी कोणतीही समस्या नव्हती. यानंतर दोन्ही ग्रुपमधील लोकांच्या ब्लडचे सॅम्पल घेऊन टेस्ट करण्यात आली. त्यातून समजलं की, ज्या लोकांना लिव्हर कॅन्सर होता, त्यांच्या शरीरात केमिकलचं प्रमाण जास्त होतं. हे केमिकल व्यवस्थित स्वच्छ न करण्यात आलेल्या भांड्यांमधून त्यांच्या शरीरात गेलं होतं आणि मग लिव्हरवर त्यांनी अटॅक केला.
शरीरात जातात अनेक केमिकल्स
डॉक्टरांनुसार, शरीरात पोहोचल्यावर केमिकल अनेकप्रकारे नुकसान पोहोचवतात. याने शरीरातील ग्लूकोज कमी होतं. सोबतच लिव्हरमध्ये अमिनो अॅसिडही बदलतात. यामुळे लिव्हरच्या चारही बाजूने जास्त फॅट जमा होतं. ज्यामुळे लोकांना फॅटी लिव्हर आणि नंतर लिव्हर कॅन्सरची समस्या होते.