Health Tips : दरवर्षी ४ फेब्रुवारीला वर्ल्ड कॅन्सर डे (World Cancer Day 2022) साजरा केला जातो. याचा उद्देश लोकांना या गंभीर आजाराबात जागरूक करणं हा आहे. जगभरात लिव्हर कॅन्सरमुळे (Liver Cancer) सर्वात जास्त मृत्यू होतात. तशी तर हा कॅन्सर होण्यामागे अनेक कारणे आहेत. पण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे हा आजार वेगाने वाढतो. सामान्यपणे याची सुरूवात फार जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्याने होते. जंक फूड आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत. कारण यात कोणतेच पोषक तत्व नसतात.
कसा होतो लिव्हर कॅन्सर?
बंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटलचे लीट कन्सल्टंट डॉक्टर राजीव लोचन यांनी हिंदुस्थान टाइम्सला सांगितलं की 'लिव्हर कॅन्सरचं सर्वात सामान्य रूप हेपॅटोसेलुलर कार्सिनोमा आणि इंट्राहेपेटिक कोलेंजियोकार्सिनोमा आहेत. आणि यामुळे हेपेटिक एडेनोमा आणि फोकल नोड्यूलर हायपरप्लासियासारखा लिव्हर ट्यूमर होऊ शकतो. याच्या प्रमुख कारणांमध्ये हेपेटायटिस B आणि C व्हायरल संक्रमण, सिरोसिस, आर्सेनिकने दुषित पाणी, लठ्ठपणा, डायबिटीज आणि जास्त मद्यसेवन करणे याचा समावेश आहे'.
या सर्व गोष्टींमुळे फॅटी लिव्हरही बनतं. ज्याने पुढे जाऊन कॅन्सर होतो. फॅटी लिव्हर सामान्यपणे लठ्ठ लोक, डायबिटीजचे रूग्ण आणि हाय लिपिड प्रोफाइल असणाऱ्या लोकांमध्ये होतो. खाण्याच्या चुकीच्या सवयी, नेहमीच फॅट आणि शुगरयुक्त भरपूर आहाराने फॅटी लिव्हरची समस्या वाढते. ज्या लोकांचं मेटाबॉलिज्म खराब असतं, त्यांच्यात हा ट्यूमरमध्ये बदलतो.
जंक फूडने लिव्हर कॅन्सरचा धोका
आजकाल जंक फूड लोकांच्या लाइफस्टाईलचा एक नियमित भाग झाले आहेत. या सर्व फास्ट फूडमुळे केवळ लठ्ठपणाच वाढतो असं नाही तर तुमच्या लिव्हरचंही नुकसान होतं. याने सिरोसिस होऊ शकतो आणि लिव्हर कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. एक्सपर्ट सांगतात की, जंक फूडचा अर्थ आहे की, तुम्ही जे काही खाता ते योग्य प्रकारे शिजवलं गेलेलं नाही. किंवा त्यात जास्त प्रमाणात हायड्रोकार्बन आहेत. यात काही असे केमिकल्स असतात जे कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सरला कारणीभूत असतात.
आपल्या आतड्यांमध्ये गुड आणि बॅड दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात. जास्त जंक फूड खराब बॅड बॅक्टेरिया वाढवण्याचं काम करतात आणि यामुळे कॅन्सरही होऊ शकतो. डॉक्टर्स सांगतात की, खराब लाइफस्टाईल, जास्त कॅलरी असणारे पदार्थ, हाय कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ, सोडा ड्रिंक्स पिणे आणि एक्सरसाइज न केल्याने लोकांना लिव्हरसंबंधी समस्या होत आहे. एक्सपर्टनुसार, कोणत्याही रूपात जंक फूड खाणं टाळलं पाहिजे आणि फीट राहण्यासाठी योग्य प्रमाणात जास्त प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट असलेले पदार्थ खावीत. त्यासोबतच तुमचं कोलेस्ट्रॉल लेव्हल नेहमी योग्य ठेवण्याचा प्रयत्न करा.