Health Tips : दारूचा यकृतावर प्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. कारण दारू सर्वात पहिल्यांदा पोहोचते ती यकृत अर्थात लिव्हरपर्यंत. कारण अल्कोहोलचे अर्थात दारूचे ९० टक्के विघटन हे लिव्हरमध्ये होते. त्यामुळे तुम्ही जितके जास्त दारूचे सेवन करता, तितकाच ताण यकृतावर अर्थात लिव्हरवर होतो. परिणामी यकृत लवकर निकामी होऊ लागते. तुमच्या यकृताला दारूमुळे पटकन हानी पोहोचू शकते आणि त्यामुळे त्याचा त्वरित दुष्परिणाम यकृतावर झालेला दिसतो.
विषारी पदार्थ नष्ट करण्याचे काम :
यकृत शरीरातील विषारी पदार्थ नष्ट करत असते. यामध्ये अल्कोहोलचाही समावेश आहे. जेव्हा तुम्ही अल्कोहोलचे सेवन करता, तेव्हा यकृतामध्ये असणारे विविध प्रकारचे एन्झाइम ते खंडित करू लागतात. ज्यामुळे ते अल्कोहोल शरीराबाहेर टाकण्यासाठी काम करते.
यकृत शरीरातील विषारी पदार्थ तोडण्याचे काम करते. यामध्ये अल्कोहोलचाही समावेश आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या यकृताच्या क्षमतेपेक्षा जास्त अल्कोहोल शरीरात घेता, तेव्हा त्याचा यकृतावर विपरित परिणाम होतो.
दारू पिण्याचे दुष्परिणाम:
मानसिक स्थिती ढासळायला लागते. उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो.शारीरिक असंतुलन होते. सतत भीती वाटणे.दारू पिऊन बेशुद्ध पडणे.हृदयाचे ठोके अनियमित होणे.अति घाम येणे.
यकृताच्या आजाराची काही लक्षणे :यकृतावर सूज, थकवा, वजन कमी होणे, भूक न लागणे, मळमळ किंवा उलट्या
यकृताचे आरोग्य अशा प्रकारे वाढवा:
निरोगी आहार : यकृताच्या आरोग्याला चालना देण्यासाठी, तुम्ही ताज्या गोष्टी, संपूर्ण धान्य, प्रथिने तसेच उच्च साखर, अस्वास्थ्यकर चरबी आणि परिष्कृत कार्बोहायड्रेट मर्यादित प्रमाणात वापरणे महत्त्वाचे आहे.
वजन नियंत्रित करा : लठ्ठपणामुळे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगाचा धोका लक्षणीय वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे वजन राखणे महत्त्वाचे आहे.
नियमित आरोग्य तपासणी : नियमित आरोग्य तपासणी करून तुम्ही कोणताही आजार वेळेपूर्वी शोधू शकता. जर तुम्हाला अल्कोहोलशी संबंधित यकृत रोगाची सुरूवातीची लक्षणे दिसली तर नक्कीच डॉक्टरांना दाखवा.
संतुलित आहार घ्या : निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. यकृत निरोगी आणि मजबूत होण्यासाठी दररोज व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. यकृताला जे आजार झाले आहेत, ते स्वतः यकृत दुरुस्त करून घेऊ शकते. काही औषधांमुळे यकृताला इजा झाली असेल, तर मुख्य म्हणजे दारूचे सेवन थांबविणे आवश्यक आहे. स्वतःचं शरीर हे यकृताला बाधक ठरतं. स्टिरॉइड किंवा इतर औषधं घेऊन यकृताचे होणारे नुकसान थांबवू शकतो.- डॉ. सुहास थोरात, यकृततज्ज्ञ