Liver Disease Sign: लिव्हर शरीरातील सगळ्यात मोठा आणि महत्वाचा अवयव आहे. लिव्हर पित्त तयार करणे आणि काढण्यासोबतच कोलेस्ट्रॉल, हार्मोन रिलीज करण्यासाठीही जबाबदार असतं. सोबतच लिव्हर एंजाइम्स सक्रिय करण्यासही मदत करतं. त्याशिवाय हे चरबी, प्रोटीन आणि कार्बोहाइड्रेटचं चयापचय करतं.
अशात लिव्हरमध्ये कोणतीही समस्या किंवा लिव्हरसंबंधी आजार झाला गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हे टाळण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे संतुलित जीवनशैली. कारण याची अनेक लक्षण वेळेवर दिसत नाहीत, जोपर्यंत आजार वरच्या किंवा शेवटच्या स्टेजवर पोहोचत नाही. त्याशिवाय काही लक्षण असेही आहेत ज्याला लोक सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही संकेतांबाबत सांगणार आहोत.
कसा वाढतो लिव्हर डिजीज
लिव्हर डिजीजच्या चार स्टेज असतात. याच्या पहिल्या स्टेजमध्ये लिव्हरवर सूज येते, जी जखम किंवा रक्तात टॉक्सिन असल्याचा परिणाम असतो. दुसऱ्या स्टेजमध्ये ही सूज फायबरोसिसमध्ये बदलते. ज्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये लिव्हरमध्ये झालेलं डॅमेज सिरोसिस बनतं. त्यानंतर चौथी आणि शेवटची स्टेज ज्यात लिव्हर काम करणं बंद करतं.
नखांमध्ये दिसतात हे संकेत
लिव्हर डिजीजचे जास्तीत जास्त संकेत आजाराच्या शेवटच्या स्टेजमध्ये दिसू लागतात. डॉक्टरांनुसार, एक सामान्य लक्षण जे रूग्णांमध्ये सगळ्यात जास्त दिसतं, ते आहे नखांमध्ये बदल.
2010 मध्ये इजिप्तमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, लिव्हरचे आजार असलेल्या 68 टक्के रूग्णांमध्ये नखांमध्ये बदल बघण्यात आला. त्याशिवाय जर्नल ऑफ इवोल्यूशन ऑफ मेडिकल अॅन्ड डेंटल साइंसेजमध्ये प्रकाशित 2013 च्या एका रिसर्चमध्ये रूग्णांच्या 72 टक्के सॅम्पलमध्ये नखांचा आकार, रंग, जाडेपणा यात बदल बघण्यात आला.
नखांचा आकार बदलणं असू शकतं लक्षण
सोहाग विश्वविद्यालयातील त्वचा विज्ञान विभागाने सांगितलं की, 'फिंगर क्लबिंग' क्रोनिक लिव्हर डिजीज ज्याप्रमाणे प्राथमिक पित्त सिरोसिस आणि जुन्या अॅक्टिव हेपेटायटिसचा एक सामान्य संकेत आहे. यात नखांचा दोन तृतियांश भाग पावडर बनतं.
सिरोसिस लक्षण
त्वचा आणि डोळे पिवळे पडणे
रक्ताची उलटी
त्वचेवर खाज
गर्द रंगाची लघवी
सहजपणे जखमा होणे
सूजलेले पाय किंवा पोट
लिबिडोमध्ये कमतरता
लिव्हर डिजीज वाढणं कसा रोखावा
सध्या सिरोसिसवर काहीच उपाय नाहीये. पण याची लक्षण वाढण्याची गती कमी केली जाऊ शकते. अशात एक्सपर्ट सिरोसिसच्या रूग्णांना मद्यसेवन आणि धूम्रपान न करण्याचा सल्ला देतात. सोबतच असे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात ज्यात सोडिअम कमी असेल. कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव करा.