शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

बापरे! तुमचा आवाज बदललाय? जाणून घ्या, लाँग कोविडचं 'हे' नवं लक्षण, कोणाला आहे सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 1:33 PM

long covid new symptoms : कोरोना व्हायरसचा संसर्ग काही प्रमाणात थांबला आहे, परंतु अद्याप त्याचे संकट पूर्णपणे संपलेले नाही. तरीही दररोज हजारो प्रकरणे नोंदवली जात आहेत.

कोरोना महामारीचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम झाला आहे. या महामारीचा आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग काही प्रमाणात थांबला आहे, परंतु अद्याप त्याचे संकट पूर्णपणे संपलेले नाही. तरीही दररोज हजारो प्रकरणे नोंदवली जात आहेत. ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना बरे वाटायला किमान 12 आठवडे लागतात, परंतु काही लोक असे आहेत ज्यांना 12 आठवड्यांनंतरही लक्षणे दिसणे सुरूच असते, त्याला लाँग कोविड म्हणतात.

कोरोना महामारीला जवळपास 2 वर्षे उलटून गेली आहेत, परंतु तरीही शास्त्रज्ञ आणि आरोग्य तज्ञ यावर सतत संशोधन करत आहेत. शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसच्या दीर्घकालीन समस्या शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, दरम्यानच्या काळात ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एक लेख प्रकाशित झाला होता ज्यामध्ये कोविड स्ट्रॅंगल हे दीर्घ कोविडचे लक्षण होते.

कोविड स्ट्रॅंगल म्हणजे काय?

पूर्वी खोकला, सर्दी आणि ताप हे कोरोनाचे प्रमुख लक्षण होते. ताप येण्यापूर्वी लोकांना घसा खवखवण्याचा त्रास होऊ लागला आणि त्यामुळे कोरोनाची लक्षणे दिसू लागली. आता खोकला, घसा दुखण्यासोबत आणखी एक लक्षण जोडले गेले आहे ते म्हणजे तुमचा बदललेला आवाज. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला घशाची कोणतीही गंभीर समस्या नसेल आणि अचानक तुमचा आवाज बदलला, तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे कोरोनाचे लक्षण असू शकते ज्याला कोविड स्ट्रॅंगल म्हणतात.

गिळताना समस्या

कोविड स्ट्रॅन्गलमध्ये श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तुम्हाला काहीही गिळताना त्रास होऊ शकतो. जेव्हा आपण कोणतेही अन्न किंवा द्रव फुफ्फुसात जाण्यापासून रोखण्यासाठी गिळतो तेव्हा आपण नैसर्गिकरित्या आपला श्वास रोखतो. श्वास घेण्यात अडचण आल्याने श्वासोच्छवास आणि गिळताना समन्वय साधण्यात अडचण येऊ शकते.

लाँग कोविडची समस्या कोणाला होऊ शकते याबद्दल सध्या कोणतेही स्पष्ट उत्तर नाही. यावर तज्ज्ञ संशोधन करत आहेत. जरी शास्त्रज्ञ म्हणतात की लाँग कोविड अशा लोकांमध्ये सामान्य आहे ज्यांना आधीच गंभीर आजार आहे. तज्ज्ञांना त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की, जे लोक दीर्घकाळ रुग्णालयात दाखल होते आणि ज्यांचे वय 35-69 वर्षे होते त्यांच्यामध्येही हे प्रमाण अधिक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स