खाण्या-पिण्याच्या पदार्थांची चव आणि गंध न जाणवणे कोरोना व्हायरसच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. पण ज्या लोकांमध्ये कोरोना अधिक काळ राहतो अशा लोकांमध्ये आता काही वेगळीच लक्षणे समोर आली आहेत. UK तील प्रसिद्ध ईएनटी सर्जन डॉक्टर निर्मल कुमार म्हणाले की, कोरोनाची जास्त काळ लागण झालेल्या पीडितांना माशांचा वास, सल्फर आणि एखाद्या आजारासारखा दुर्गंध येत आहे.
या असामान्य लक्षणाला पेरोस्मिया म्हटलं जातं. ज्यात सुघंण्याची क्षमता बिघडते. हे लक्षण सामान्यपणे तरूणांमध्ये आणि हेल्थवर्कर्समध्ये आढळून येतं. डॉक्टर कुमार यांनी हे लक्षण फार विचित्र आणि अजब असल्याचं म्हटलं आहे. डॉक्टर कुमार हे डॉक्टर्सच्या अशा टीमपैकी एक आहेत ज्यांनी मार्च महिन्यात कोरोना व्हायरसच्या एका प्रमुख लक्षणाच्या रूपात एनोस्मिया म्हणजे वास न येणे किंवा खाण्या-पिण्याच्या पदार्थांचा गंध न जाणवणे याची ओळख पटवली होती.
प्राध्यापक कुमार यांनी स्काय न्यूजला सांगितले की, UK मध्ये बऱ्याच दिवसांपासून एनोस्मियावरर उपचार घेत असलेल्या हजारो कोरोना रूग्णांपैकी काही लोकांना पेरोस्मियाा अनुभव येत आहे. त्यांनी सांगितले की, या रूग्णांची वास घेण्याची क्षमता किंवा चवीची क्षमता भ्रमित होत आहे. जास्तीत जास्त रूग्णांना काही वेगळीच दुर्गंधी येत राहते आणि यामुळेच ते हैराण झाले आहेत.
जास्त काळ कोरोना व्हायरसची लागण झालेली असल्याने याचा परिणाम पुढील अनेक आठवडे आणि अनेक महिेने शरीरावर राहतो. डॉक्टर कुमार याला न्यूपोट्रॉपिक व्हायरसचं रूप मानतात. ते सांगतात की, या व्हायरस आणि मेंदूच्या नसांमध्ये एक संबंध आहे. खासकरून अशा नसा ज्या गंध ओळखण्यास मदत करतात. याने इतर नसाही प्रभावित होतात.
लंडनमधील २४ वर्षाचा डॅनिअल सेवेस्कीने स्काय न्यूजला सांगितले की मार्च महिन्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर दोन आठवडे त्याने चव आणि गंधाची क्षमता गमावली होती आणि आता तो पेरोस्मियाने पीडित आहे. सेवेस्कीने सांगितले की, त्याला सल्फर किंवा टोस्ट जळण्यासारखा वास येतो. सेवेस्की म्हणाला की, तो आता आधीसारखा चवीने जेवण करू शकत नाही.
लिन कॉर्बेट नावाच्या एका इतर महिलेने सांगितले की मार्च महिन्यात तिचा चव आणि गंधाची क्षमता गेली होती. जून महिन्यात तिची गंधाची क्षमता परत आली. पण ही आधीसारखी नव्हती.कॉर्बेट सांगते की, मला आता जास्त वेळ खराब वास येतो आणि असा वास मला याआधी कधीही आला नाही. मला कॉफी फार पसंत होती. पण आता मला कॉफीचा बीअर किंवा पेट्रोलसारखा वास येतो.
UK मध्ये पेरोस्मिया रूग्णांसाठी स्मेल ट्रेनिंगसारखी थेरपीही चालवली जात आहे. यात रूग्णांना दररोज जवळपास २० सेकंदासाठी गुलाब, लिंबू, लवंग आणि नीलगिरीच्या तेलाचा गंध घेण्यास सांगितला जातो. जेणेकरून हळूहळू त्यांची गंध घेण्याची क्षमता परत येईल.