तुम्ही सुद्धा जास्तवेळ एकाचजागी बसून काम करता का? आपल्यापैकी अनेकजण तासनंतास बसून काम करण्याची नोकरी करतात. खासकरून डेस्कवर जॉब करत असलेल्या लोकांना जास्तवेळपर्यंत बसून राहण्याची सवय असते. जास्तवेळ बसून राहिल्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. हे तुम्हाला माहीतंच असेल. पण एका रिसर्चनुसार अधिकवेळ एकाच जागी बसल्यामुळे कॅन्सरच्या आजाराचा धोका उद्भवू शकतो. ३० मिनिटांचा व्यायाम करून कॅन्सरचा धोका कमी करता येऊ शकतो. जामा ऑन्कोलॉजी या जर्नलमध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला होता.
या अध्ययनानुसार जास्तवेळ बसण्याची सवय कॅन्सरच्या धोक्याला निमंत्रण देते. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या एंडरसन कॅन्सर केअर सेंटरचे डॉक्टर सुसन गिलक्रिस यांना सांगितले की, या प्रकारचं हे पहिले अध्ययन असून यात जास्त वेळ बसण्याची सवय आणि कॅन्सरच्या आजारांचा संबंध लावण्यात आला होता. दिवसातून फक्त ३० मिनिटं व्यायाम करून हा धोका कमी करता येऊ शकतो. या अध्ययनात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, जास्त वेळ बसून न राहता शारीरिक हालचाली करायला हव्यात.
या अध्ययनासाठी ८ हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. त्या सगळ्यांना ट्रॅकिंग डिव्हाईस देण्यात आले होते. ज्यात एक्सेलोमीटर लावण्यात आले होते. या डिव्हाईसमुळे सतत ७ दिवसांपर्यंत लोकांच्या बसण्या उठण्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते.
त्या अध्ययनाची सुरूवात २०१३ मध्ये झाली होती. त्यावेळी कोणताही व्यक्ती कॅन्सरचा शिकार नव्हता. पण पाच वर्षानंतर २०१९ मध्ये तज्ज्ञांनी जेव्हा परत या अध्ययनाला सुरूवात केली. तेव्हा दिसून आले की, खूप कमी लोक नियमित शारिरिक हालचाली करत होते. बाकीचे लोक दिवसातील जास्तीत जास्त वेळ बसून घालवतात.
या लोकांमध्ये ८२ टक्क्यांनी कॅन्सरचा धोका वाढला होता. या अध्ययनात लिंग, वय, इतर आजार या गोष्टींही विचारात घेतल्या होत्या. हेल्दी लाईफस्टाईल असल्यास कॅन्सरमुळे होणारे मृत्यू ५० ट्क्क्यांनी रोखता येऊ शकतात. त्याासाठी खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या सवयी नियमित असायला हव्यात. मादक पदार्थाचे सेवन करू नये.
चपला, बुटांसोबत तुम्ही कोरोना विषाणूही घरी आणताय का? 'अशी' घ्या काळजी
CoronaVirus : बापरे! पहिल्यांदाच समोर आला कोरोना विषाणूचा 'असा' प्रकार; डॉक्टरही हैराण