गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात कहर केलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत अजूनही नवनवीन माहिती समोर येत आहे. संशोधक याविषयी सखोल अभ्यास करत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या शरीरात तयार झालेल्या एंटीबॉडीजमुळे कोरोना संसर्गपासून ८ महिन्यांपर्यंत संरक्षण मिळू शकतं असा दावा नव्या संशोधनातून समोर आला आहे. कोरोना लस तयार करणाऱ्या कंपन्यांच्या दृष्टीनेही ही चांगली बातमी असून, लशीद्वारे शरीरात सोडलेल्या अँटीबॉडीजमुळेही कोरोनापासून दीर्घ काळ संरक्षण मिळू शकेल, असं आरोग्यतज्ज्ञांचं मत आहे.
एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर साधारणपणे तीन ते पाच महिने एंटीबॉडीजमुळे संरक्षणं मिळतं असा अनेकांचा समज होता. या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांपर्यंत संरक्षण मिळण्याची शक्यता जाहीर होणं, ही मोठी गोष्ट आहे. पश्चिम दिल्लीतल्या बीएलके हॉस्पिटलमधल्या श्वसन रोग विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ संचालक संदीप नायर यांनी सांगितलं की, ''या माहितीमुळे लसनिर्मिती करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भयंकर रोगाला प्रतिकार करणाऱ्या लसी तयार झाल्या, की त्या दीर्घ काळपर्यंत संरक्षण देऊ शकतील, अशी आशा या संशोधनामुळे निर्माण झाली आहे.''
अमेरिकन तज्ज्ञांनी या संशोधनात पुढाकार घेतला होता. कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यातील अँटीबॉडीज, मेमरी बी सेल्स, हेल्पर टी सेल्स, किलर टी सेल्स यांची संख्या मोजण्यात आली. संशोधनातून असं निरीक्षण नोंदवण्यात आलं, की विशिष्ट रोगकारक घटकाला प्रतिकार करण्याची आपोआप कार्यान्वित होणारी यंत्रणा पहिल्या संसर्गानंतर ८ महिन्यांपर्यंत टिकू शकते. या संशोधनात सहभागी असलेल्या प्रमुख तज्ज्ञ डॅनिएला वेस्कॉफ यांनी सांगितलं, की लसीचा अभ्यास सध्या प्राथमिक स्तरावर आहे; मात्र लशीमधून तयार करण्यात आलेली प्रतिकारशक्तीही एवढाच काळ टिकू शकेल, असं संशोधनातून पुढे येईल.'' समोर आली जगभरात कोरोना पसरवणाऱ्या वटवाघळाची नवी प्रजात; रंग पाहून वैज्ञानिकही चकीत
मेदान्ता- द मेडिसिटी'मधील संसर्गजन्य रोगतज्ज्ञ नेहा गुप्ता यांनी सांगितले की, '' T सेल्समुळे रोगप्रतिकारशक्ती तयार होते आणि त्यामुळे अँटीबॉडीज मेमरी बी सेल्सची निर्मिती करू शकतात. त्याद्वारे कोविड-19पासून संरक्षण मिळू शकतं.'' गुरुग्राममधल्या फॉर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमधल्या न्यूरॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रवीण गुप्ता यांनी सांगितलं, की ''कोरोनामधून रूग्ण बरे होण्याचा जास्तीत जास्त अनुभव येत जाईल, तसतसं त्यांच्या शरीरातल्या अँटीबॉडीजवर लक्ष ठेवता येईल. सहा महिने किंवा काही पेशंटमध्ये एका वर्षापर्यंतही ही कोरोनाशी लढत असलेल्या एंटीबॉडीज टिकून राहू शकतात.'' धक्कादायक! 'या' व्यक्तीने शरीरात इंजेक्ट केलं मॅजिक मशरूमचं पाणी, नसांमध्ये उगवू लागले मशरूम....