- नितांत महाजनआॅफिस एटिकेट्स नावाचा एक प्रकार असतो, आणि तो अनेकांना माहितीच नसतो. त्यामुळे त्यांचा वेंधळेपणा, भोचकपणा हा बाकीच्या कलिग्जना आगाउपणा आणि उद्धटपणा वाटतो. आपल्या कामातला अडथळा तर वाटतोच, याशिवाय ते आपल्या प्रायव्हसीचा भंग करताहेत, आपल्या कामात नाक खुपसताहेत असं वाटतं. खरंतर हे मान्य करायला हवं की आपले कलिग्न हे आॅफिसात तरी आपले कलिग्ज, सहकारीच असतात. मित्र नसतात. मित्र असलेच तर आॅफिसच्या बाहेर. त्यामुळे आपलं काम सोडून त्यांच्या कम्प्युटरमध्ये घुसून वाचू नये. ते आपल्या स्क्रिनवर काही लिहित असतील तर आपलं कामधाम सोडून तेच वाचत बसू नये. तसं तुम्ही करत असाल तर तुमच्याविषयी नाराजी वाढतेच. तुमचा त्रास होतोच इतरांना मात्र तुमच्यासंदर्भातही काही ठोकताळे नव्या जगात लावता येवू शकतात. आणि तसंच खरंच तुमचं व्यक्तिमत्व असेल तर नव्या काळात टीममध्ये काम करणं आणि यशस्वी होणं तुम्हाला अवघड जावू शकतं.तपासून पहा तुम्ही हे करता का?सतत लक्ष दुसऱ्याच्या स्क्रिनकडे? तुमचं कामात लक्ष नाही..असं काही आहे का की आपलं आपल्याच कामात लक्ष नाही. आपल्या कामात मन रमत नाही. ते काम आपल्याला धड येत नाही म्हणून मग दुसरा त्याच्या स्क्रिनवर काय लिहितो हे आपण चोरचोरुन वाचत असतो?