(Image Credit : Diet Detective)
सध्या लोक संतुलित आणि पौष्टिक आहारापासून दूर जात असून जंक फूडकडे अधिक आकर्षित होताना दिसत आहेत. यामुळेच अनेकांना वाढणाऱ्या वजनाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. वजन वाढण्यामागे खराब जीवनशैली आणि असंतुलित आहार हिच प्रमुख कारणं आहेत. त्याचबरोबर दिवसभराच्या थकवा दूर करण्यासोबतच तुम्ही आरोग्याच्या इतर समस्यांपासूनही दूर राहू शकता. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करणाऱ्या 5 शाकाहारी पदार्थांबाबत सांगणार आहोत.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये असलेली खनिज तत्व, व्हिटॅमिन्स, प्रोटीन, फायबर आणि अॅन्टी-ऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर वजन कमी करून शरीराची ऊर्जा आणि शक्तीही टिकवून ठेवण्याचं काम करतात. एवढचं नाही तर फॅट्सचे प्रमाण कमी करून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत लाभदायक ठरतात.
सोयाबीन
मांसाहारी पदार्थ जसं मासे आणि चिकन शरीरामध्ये फॅट्सचे प्रमाण वाढवून लठ्ठपणासोबतच अनेक आजार वाढविण्याचं काम करतात. ही कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही सोयाबिनपासन तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता. यामुळे शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते. सोयाबीनमध्ये प्रोटीन, फायबर यांसारखे अनेक गुणधर्म आढळून येतात. जे शरीरामधील फॅट्सचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतात.
धान्य
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी धान्य अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये भरपूर प्रमाणात पो,क तत्व असतात. हे आपल्या शरीराच्या मजबुतीसाठी आणि शरीराचं आरोग्यापासून रक्षण करण्यासाठी मदत करतात. धान्यांमध्ये तुम्ही गव्हाच्या चपात्या, जवस, ब्राउन राइस, रवा आणि दलिया यांसारख्या पदार्थांचे सेवन करू शकता. या पदार्थांमधून लोह तत्व आणि झिंक मुबलक प्रमाणात शरीराला मिळतं. त्याचबरोबर आपल्या शरीराचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
फळं
वजन नियंत्रित करण्यासाठी फळांचं सेवन करणं लाभदायक ठरतं. यामध्ये खनिज तत्व, व्हिटॅमिन, अॅन्टीऑक्सिडंट, लो-कॅलरी आणि फायबरचे अधिक प्रमाण असते. यामुळे शरीरामध्ये ऊर्जेचा स्त्रोत वाढतो. याच्या सेवनाने पोट बराच वेळ भरल्याप्रमाणे वाटते. त्यामुळे आपण ओवरइटिंग करत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. फळांमध्ये टरबूज, सफरचंद, खरबूज, जांभूळ, संत्री,पपई या पदार्थांचे सेवन करा. यामुळे शरीराची पचनक्रिया सुरळीत होते. तसेच शरीरातील फॅट्स कमी करून वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
ड्रायफ्रुट्स
ड्रायफ्रुट्सचं सेवन शरीराचं वजन कमी करण्यासाठी मदत करतं. यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतं. बदाम, ड्रायफ्रुट्स, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अक्रोड इत्यादी शरीराच्या कोलेस्ट्रॉलचा स्तर आणि वजन कमी करण्यासाठी मदत करतं. यांचे सेवन केल्याने शरीराची भूक कमी होते. परिणामी शरीचं वजन नियंत्रणात राहतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपाय म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं.