शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

डाएट आणि एक्सरसाइज न करताही असं कमी करू शकता तुम्ही वजन!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 11:01 AM

जर आम्ही तुम्हाला विचारलं की, वजन कमी करण्यासाठी काय करायला हवं? तर तुमची उत्तरं साहजिकच रनिंग, डाएट, जॉगिंग, एक्सरसाइज, जिम अशी वेगवेगळी असतील.

जर आम्ही तुम्हाला विचारलं की, वजन कमी करण्यासाठी काय करायला हवं? तर तुमची उत्तरं साहजिकच रनिंग, डाएट, जॉगिंग, एक्सरसाइज, जिम अशी वेगवेगळी असतील. पण आम्ही तुम्हाला सांगतोय की, अशाही काही पद्धती आहेत ज्याद्वारे काहीही न करता तुम्ही केवळ झोपून वजन कमी करू शकता. विश्वास नाही बसत ना? 

भरपूर झोप घ्या स्लिम व्हा

ही बाब अगदी बरोबर आहे. कारण आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपलं शरीर रिपेअरिंग मोडमध्ये राहतं. जे लोक पुरेशी झोप घेत नाहीत, त्यांच्या शरीराचं सिस्टीम पूर्णपणे डिस्टर्ब होतं. हार्मोन्समध्येही असंतुलन होतं. ज्याचा परिणाम आपल्याला जाडेपणातून बघायला मिळतो. अशात आता रात्री उशीरापर्यंत फोनवर बोलणं, टीव्ही बघत बसणं बंद करा. भरपूर झोप घ्या आणि शरीराची सिस्टीम फिट ठेवा.

चांगल्या झोपेने बर्न होतात २० टक्के कॅलरी

जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीराच्या सामान्य प्रक्रिया सुरूच असतात. शरीराच्या या सामान्य प्रक्रिया सुरूच ठेवण्यासाठी एनर्जीची गरज असते आणि ही एनर्जी शरीरातील कॅलरी बर्न करण्यास मदत करते. अशात तुमची झोप जेवढी चांगली होईल तितक्या जास्त कॅलरी बर्न होतील. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशननुसार, जे लोक चांगली झोप घेतात ते कमी झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत २० टक्के कमी कॅलरी बर्न करतात. 

निर्वस्त्र होऊन झोपा

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ अॅन्ड ह्यूमन डेव्हलेपमेंट, मेरीलॅंड आणि स्टॅनफर्ड यूनिव्हर्सिटीकडून करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, जर रात्री तुमची झोप उकाड्यामुळे व्यवस्थित होत नसेल तर तुमचं शरीर सामान्यापेक्षा जास्त कोर्टिसोल रिलीज करतं. यामुळे तुमची भूक वाढते. याचाच परिणाम म्हणजे तुमचं वजन वाढतं. तेच जर तुम्ही कमी कपड्यात किंवा निर्वस्त्र होऊन झोपाल तर शरीर थंड राहणार आणि याने फॅट बर्न होणार. याने वजन कमी करण्यास मदत मिळते. 

रात्री उशीरा खाणे टाळा

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्लॅन करत असाल आणि तुमचं रात्रीचं जेवण ७ किंवा ८ वाजता करत असाल अर्थातच तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागी राहणार असल्याने तुम्हाला पुन्हा भूक लागणार. आणि तुम्ही पुन्हा रात्री काहीतरी खाणार. यूनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलवेनियाच्या एका रिसर्चनुसार, जर तुम्ही सतत एक आठवडा रात्री उशीरा काही खात असाल तर तुमचं वजन १ किलो ग्रॅमपर्यत वाढू शकतं. त्यामुळे लवकर झोपा आणि रात्री उशारी काही खाणे बंद करा. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स