Love Bite Side Effects : कपल्स आपलं प्रेम वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत असतात. यातीलच एक बाब म्हणजे लव्ह बाइट. प्रेमाच्या नात्यात किंवा वैवाहिक जीवनात शारीरिक संबंधादरम्यान लव्ह बाइट फारच कॉमन आहे. यातून त्यांना आनंद मिळतो. अनेकदा पार्टनर अतिउत्साहात शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी लव्ह बाइट देतात. ज्यामुळे त्या भागावर लाल रंगाचा चट्टा दिसतो.
लव्ह बाइटमध्ये एक पार्टनर दुसऱ्याच्या त्वचेवर किस करतो किंवा चावा घेतो. तुमच्यापैकीही बऱ्याच लोकांनी पार्टनरला असा लव्ह बाइट दिला असेल. यात काही चुकीचंही नाही. रोमान्स दरम्यान उत्साह वाढवण्यासाठी असं केलं जातं. पण अनेकदा याचे साइड इफेक्टही बघायला मिळतात. चला जाणून घेऊ लव्ह बाइट कसा नुकसानकारकही ठरू शकतो.
लव्ह बाइट म्हणजे काय?
लव्ह बाइटला 'हिक्की' असंही म्हटलं जातं. ब्लड लीक झाल्याने आणि सेल्स फाटल्याने त्वचेवर पडणाऱ्या डागाला लव्ह बाइट म्हणतात. अशी खूण शरीराच्या नाजूक भागावर जोरात किस केल्याने किंवा चावा घेतल्याने होते. त्वचेवर लाल रंगाची खूण तयार होते. लव्ह बाइटला सामान्यपणे प्रेम आणि विश्वासाची निशाणी मानलं जातं. हा आपल्या पार्टनर प्रति प्रेम व्यक्त करण्याचा एक सामान्य प्रकार आहे.
लव्ह बाइटचे साइड इफेक्ट
इन्फेक्शनचा धोका
ओरल हर्पीस व्हायरसने पीडित व्यक्तीने आपल्या पार्टनरला लव्ह बाइट दिला तर त्यांच्या पार्टनरच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा होऊ शकतात. काही दिवसांनी पार्टनरही या समस्येने ग्रस्त होईल.
लवकर जात नाही चट्टा
लव्ह बाइटचा चट्टा फारच डार्क असतो. त्यामुळे ते लवकर जात नाही. कपड्यांनी कव्हर नसलेल्या त्वचेवर तर ते अधिक स्पष्ट दिसतात. ज्यामुळे तुम्हाला लोकांच्या नजरेंचा सामनाही करावा लागतो. अनेकदा गोऱ्या लोकांना या गोष्टींचा जास्त सामना करावा लागतो. याचा मानसिक त्रास होऊ शकतो.
स्ट्रोकचा धोका वाढतो
तुम्ही विचारही करू शकत नाही, पण लव्ह बाइटमुळे तुम्हाला स्ट्रोकही येऊ शकतो. कारण जेव्हा जोशमध्ये पार्टनर त्वचेवर किस करतो किंवा चावा घेतो तेव्हा तेथील रक्त गोठू लागतं. अशा अनेक केसेस बघण्यात आल्या आहेत. ज्यात व्यक्तीच्या नसा तुटतात. यात शरीराला लवकाही मारला जाऊ शकतो.
यांना जास्त होते समस्या
जर त्वचेवर जराही दबाव पडला तर तुमच्या त्वचेवर लगेच निळी किंवा काळी पडत असेल तर तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता असल्याचा हा संकेत आहे. ज्या लोकांच्या शरीरात आयर्नची कमतरता होते, त्यांच्या शरीराव लव्ह बाईट लगेच उमटतात. अशात आहारावर लक्ष देणं गरजेचं आहे.