शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

खुद्द तज्ज्ञच सांगतायत, 'हे' ड्रिंक्स वाढवतील तुम्ही एनर्जी, वजन कमी करण्यावर तर रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 12:57 PM

तहान लागल्यावर कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करण्याऐवजी नैसर्गिक पेयांचे (natural drinks) सेवन करावे. ते केवळ स्वादिष्टच नसते तर ते तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही राहण्यात मदत करतात.

जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा सर्वप्रथम आपण कोणतीही कोल्ड ड्रिंक्स पितो. या पेयांमुळे आपली तहान काही काळ शमते खरी, पण ही शीतपेये आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे तहान लागल्यावर कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करण्याऐवजी नैसर्गिक पेयांचे (natural drinks) सेवन करावे. ते केवळ स्वादिष्टच नसते तर ते तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही राहण्यात मदत करतात.

न्यूट्रिशनिस्ट लवलीत बत्रा सांगतात की, 'आर्टिफिशियल टेस्ट आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जने समृद्ध प्रक्रिया केलेली ड्रिंक्स आरोग्यासाठी फायदेशीर नसतात. त्याऐवजी नैसर्गिक पेये आरोग्यासाठी चांगली असतात, कारण ते तुमची रक्तातील साखर वाढवत नाहीत. बत्रा यांच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी अशा ५ एनर्जी बूस्टिंग ड्रिंक्सबद्दल सांगितले आहे, जे रक्तातील साखरेची पातळी न वाढवता तुमची एनर्जी लेव्हल वाढवू शकतात. लवलीन बत्रा म्हणतात की ही सर्व एनर्जी ड्रिंक्स नैसर्गिक असल्याने ते तुमच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम न करता क्षणार्धात तुम्हाला ताजंतवानं करतात. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे डायबिटीजचे रूग्ण देखील या नैसर्गिक एनर्जी ड्रिंक्सचे सेवन न घाबरता करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया अशाच ५ नैसर्गिक एनर्जी बूस्टिंग ड्रिंक्सबद्दल.

जलजीरालोक तहान शमवण्यासाठी हमखास जलजीरा पितात. जलजीरा प्यायल्यानंतर खूप ताजेतवाने व रिफ्रेशिंग फिल होते. हे प्यायल्याने तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहते. यामध्ये असलेले पोषक घटक तुमच्या पोटाच्या सर्व समस्या दूर करतात. उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढल्यास जलजीरा प्यायल्याने शरीरातील उष्णता दूर होते. यामुळे तुमचे वजन तर कमी होतेच पण पचनसंस्थाही निरोगी राहण्यास मदत होते.

ऊसाचा रसऊसाचा रस तहान तर शमवतोच पण आपल्या संपूर्ण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतो. यामध्ये प्रोटिन, आयर्न आणि पोटॅशियमसारखे अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे ते एक चांगले एनर्जी ड्रिंक बनते. जेव्हाही तुमचा घसा कोरडा पडेल किंवा तुम्हाला थकवा जाणवत असेल तेव्हा उसाचा रस प्या. यामुळे थकवा लगेच निघून जाईल आणि तुम्हाला एकदम रिफ्रेश व एनर्जेटिक वाटू लागेल.

नारळ पाणीनारळ पाणी हे एक उत्तम एनर्जी बूस्टर ड्रिंक आहे. त्यात ९५ टक्के पाणी असते. नारळपाणी हा आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला पर्याय आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्स, अमीनो अॅसिड्स, एन्झाइम्स, बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी आणि अनेक पोषक घटक असतात. त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण 10 पट जास्त असते आणि कॅलरीजचे प्रमाण अगदी नगण्य किंवा नसल्यातच जमा असते. चांगली गोष्ट म्हणजे याच्या सेवनाने डायबिटीजची समस्याही बऱ्याच अंशी आटोक्यात ठेवली जाऊ शकते. हे नैसर्गिकरीत्या गोड असलेले पेय प्यायल्याने तुमची तहानच शमणार नाही तर याशिवाय तुम्हाला ताजेतवानेही फिल होईल.

कोम्बुचातहान लागल्यावर तुम्ही कोल्ड ड्रिंक्स पित असाल तर त्याऐवजी तुम्ही कोम्बुचा ट्राय करू शकता. कोम्बुचा हा आंबवलेला चहा म्हणजेच फर्मेंटेड टी आहे. यामध्ये काळ्या चहाला आंबवले जाते. एकदा आंबल्यावर त्यात हवे ते घटक घालून तुम्ही ते पिऊ शकता. ग्रीन टी आणि ब्लॅक टी प्रमाणेच हे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे व्हिटॅमिन बी, ग्लुकोरोनिक ऍसिड आणि अँटीऑक्सिडंट-समृद्ध पॉलीफेनॉलने समृद्ध आहे. पण कोम्बुचा त्याच्या प्रोबायोटिक बॅक्टेरिया आणि ऍसिटिक ऍसिडसाठी प्रसिद्ध आहे. हे प्यायल्यानंतर तुम्हाला उत्साही व फ्रेश वाटेल. हा चहा तुम्ही घरीही बनवू शकता किंवा बाहेरही विकत घेऊन पिऊ शकता.

सातूउष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी बहुतेक लोक सातूचे सेवन करतात. हे प्यायल्याने शरीराला थंडावा तर मिळतोच पण ते एक उत्तम एनर्जी बूस्टर ड्रिंक देखील आहे. याला गरिबांचं प्रोटिन असेही म्हटले जाते. सातूमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, मॅग्नीज आणि मॅग्नेशियम असते, परंतु सोडियमचे प्रमाण यात फारच कमी असते. हे प्यायल्यानंतर अगदी लगेचच दुस-या मिनिटाला तुम्हाला उत्साही वाटू शकते. लवलीन बत्रा म्हणते की, 'ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्हाला आर्टिफिशियल एनर्जी ड्रिंक्स पिण्याची अजिबात गरज नाही. त्यापेक्षा स्वतःला निरोगी, अॅक्टिव्ह आणि उत्साही ठेवण्यासाठी पोषक तत्वांनी भरलेले हे 5 नॅच्युरल एनर्जी ड्रिंक्स ट्राय करा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स