हाय ब्लड प्रेशर म्हणजेच हायपरटेंशनबाबत लोक नेहमीच बोलत असतात. पण जेव्हा विषय लो ब्लड प्रेशरचा म्हणजे हायपोटेंशनचा असतो तेव्हा याच्या लक्षणांबाबत आणि प्रभावांबाबत अनेकांना माहीत नसतं. जगभरातील लोक याने प्रभावित आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे बऱ्याचदा लोकांना हे माहीत नसतं की ते याने ग्रस्त आहेत. लो ब्लड प्रेशरमुळे मेंदुला ऑक्सिजन आणि महत्त्वपूर्ण पोषक तत्व मिळण्यास अडचण होते. जर वेळीच याच्या लक्षणांवर लक्ष दिलं नाही तर तुम्हाला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
लो ब्लड प्रेशरची कारणे
डिहायड्रेशन
चांगल्या आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. जर तुम्हाला सहजपणे डिहायड्रेशनची समस्या होत असेल तर तुम्ही वेळीच सावध होणे गरजेचे आहे. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवे आणि हलक्या पदार्थांचं सेवन करावं.
गर्भावस्था
गर्भवती महिलांना लो ब्लड प्रेशरचा धोका अधिक होऊ शकतो. यासाठी तुम्हाला नियमीत रुपाने चेकअप केले पाहिजे आणि चक्कर येणे किंवा कमजोरी वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
हृदयाची समस्या
हृदयाशी निगडीत समस्या तुमच्या शरीरात ब्लड सर्कुलेशनला प्रभावित करु शकतात. अशावेळी वेळीच चेकअप करुन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले पाहिजे.
पोषक तत्वांची कमतरता
व्हिटॅमिन बी १२ आणि आयर्न यांसारखे पोषक तत्वे कमी असल्यानेही अॅनिमीया होऊ शकतो. पुढे जाऊन लो ब्लड प्रेशरची समस्याही होऊ शकते.
ब्लड प्रेशरपासून बचाव करण्याचे उपाय
खूप लोक कमी मीठ खातात. खूप कमी मीठ खाल्याने लो ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. यामुळे योग्य प्रमाणात मीठाचं सेवन करा. यासोबतच भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवे. पाणी प्यायल्याने शरीराला डिहायड्रेशनची समस्या होत नाही.
लो ब्लड प्रेशरसाठी घरगुती उपाय
रोज एक कप बीटाचा रस सेवन करावा. हा रस लो ब्लड प्रेशरवर परफेक्ट उपाय आहे. यासोबतच तुम्ही एक कप हार्ड कॉफीही घेऊ शकता. काही एक्सपर्ट बदामाची पेस्ट कोमट पाण्यासोबत सेवन करण्याचा सल्ला देतात.
(टिप : हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, कारण काहींना बीटाची अॅलर्जी असण्याची शक्यता असते.)