कोरोनाच्या काळात जेव्हा एखाद्याला थोडासाही ताप आला की, असं वाटायचं की कोविड तर झाला नाही ना. खरंतर तापाचे कारण कोरोनाच असायला हवा असं नाही, इतर अनेक कारणांमुळे, संसर्गामुळे किंवा शारीरिक समस्यांमुळे आपल्याला ताप येऊ शकतो. मात्र, वारंवार ताप येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. सामान्यत: एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान सुमारे 98.6 अंश फॅरेनहाइट असते, परंतु त्यात दिवसभर चढ-उतार होत असतो. तापमान सामान्य मर्यादेपेक्षा जास्त वाढते तेव्हा ताप येतो. अनेक वेळा जेव्हा शरीराचे तापमान ९९ अंश फॅरेनहाइटपर्यंत वाढते तेव्हा आतून ताप आल्याचं जाणवू लागतं. तर, कमी उष्णतेचा ताप (Low-Grade fever) बहुतेक तज्ञांनी ९९ फॅरेनहाइट आणि १००.३ फॅरेनहाइट दरम्यान असल्याचे सांगितले आहे. काही चिकित्सक लो फिवरला १०० F ते १०२ F पर्यंत शरीराचे तापमान म्हणूनही पाहतात.
लो फिवरच्या तापाची लक्षणे -VeryWealth.com मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, लो फिवर असलेल्या काही लोकांमध्ये शरीराचे तापमान जास्त असूनही लक्षणे दिसत नाहीत. दरम्यान, लो फिवर ताप असेल तर खालील लक्षणं दिसून येतात.
- स्पर्श केल्यास शरीर गरम वाटतं
- डोकेदुखी
- थकवा
- स्नायू दुखणे
- घाम येणे
- थंडी वाजून येणे
- तंद्री वाटणे
- भूक न लागणे
- कमी लघवी होणे
- निर्जलीकरण
- आतून बरे वाटत नाही
- लो ग्रेड फिवरची कारणं -
- ताप कोणत्याही प्रकारचा असला अगदी लो ग्रेड फिवर असला तरी तुमच्या शरीरात काहीतरी बिघडल्याचे लक्षण आहे. ताप येणं म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती व्हायरस, बॅक्टेरिया किंवा इतर बाह्य घटकांच्या हल्ल्यापासून शरीराचं संरक्षण करत आहे. शरीराचे तापमान वाढल्याने शरीर संक्रमण आणि रोगांवर प्रतिक्रिया देतं, परंतु काही रोग-जंतू उच्च तापमानात वाढण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे लो ग्रेड फिवर येतो. व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन, नॉन-इंफेक्शियस रोग, स्वयंप्रतिकार रोग, तणाव, लसीकरण, विशिष्ट औषधांबद्दल संवेदनशीलता, कर्करोग, मूत्रमार्गात संसर्ग इ. यासारख्या इतर काही कारणांमुळे देखील लो ग्रेड फिवर येऊ शकतो.