Low Testosterone Level : टेस्टोस्टेरॉन पुरूषांमध्ये आढळणारं सेक्स हार्मोन्स आहे. जे कोणत्याही व्यक्तीची लैंगिक ईच्छा नियंत्रित करण्याचं आणि स्पर्म तयार होण्यासाठी गरजेचं आहे. जर हे हार्मोन शरीरात कमी झालं तर विवाहित पुरूषांना वडील बनण्यास समस्या येते. जेव्हा टेस्टोस्टेरॉन हार्मोन शरीरात कमी होऊ लागतात तेव्हा शरीर काही संकेत देतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
टेस्टोस्टरॉन कमी होण्याची लक्षणं
१) कामेच्छा कमी होणे
जेव्हा तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी होतात तेव्हा हळूहळू तुमची सेक्स ड्राइव सुद्धा कमी होऊ लागते. हे एक फारच कॉमन लक्षण आहे. यात पार्टनरसोबत फिजिकल रिलेशन ठेवण्याची ईच्छा कमी होते.
२) इरेक्शनमध्ये समस्या
टेस्टोस्टेरॉन पुरूषांमध्ये इरेक्शन मिळवण्यात आणि कायम ठेवण्यात मदत करतात. हेच कारण आहे की, एखाद्या पुरूषामध्ये याची कमतरता झाली की, त्यांनी इरेक्टाइल डिस्फंकशनची समस्या होते. अशात लैंगिक संबंध ठेवणं अवघड होतं.
३) लिंगाची साइज कमी होणे
जेव्हा पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची लेव्हल कमी होते, तेव्हा यामुळे लिंगाची लाइज कमी होऊ लागते. हे एक गंभीर लक्षण आहे. अशात वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा.
४) कमजोर मांसपेशी
टेस्टोस्टेरॉन हार्मोनने केवळ पुरूषांच्या लैंगिक आरोग्यासाठीच नाही तर मांसपेशी मजबूत ठेवण्यासाठीही महत्वाचे असतात. जेव्हा यांची लेव्हल कमी होते तेव्हा भरपूर टिश्यू तुटतात. यामुळे मांसपेशी कमजोर होतात.