Lung Cancer : सामान्यपणे असं मानलं जातं की, सिगारेट किंवा विडी ओढणाऱ्यांना फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका असतो. पण आता जर तुम्ही सिगारेट किंवा विडी ओढत नसाल तरीही तुम्हाला फुप्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. वायु प्रदूषण याचं कारण ठरत आहे. लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, धुम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये ज्या कॅन्सरच्या केसेस वाढत आहेत. रिसर्चनुसार, ज्या रूग्णांनी कधीच धुम्रपान केलं नाही, त्यांना फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याच्या केसेस वाढत आहेत.
लॅन्सेटचा हा रिसर्च इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर आणि डब्ल्यूएचओच्या वैज्ञानिकांनी केला. स्टडी दरम्यान ग्लोबल कॅन्सर ऑब्जर्वेटरी २०२२ च्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं. ज्यात आढळून आलं की, जे लोक धुम्रपान करत नाही, त्यांच्यात एडेनोकार्सिनोमा नावाचा कॅन्सर सगळ्यात जास्त आढळत आहे. हा लंग कॅन्सरचा एक प्रकार आहे.
एडेनोकार्सिनोमा असा कॅन्सर आहे, जो अशा ग्लॅंडमध्ये विकसित होतो जे शरीरात कफ आणि पचनासाठीचे तरल पदार्थ बनवतात. रिसर्चचं मत आहे की, या कॅन्सरचा संबंध धुम्रपान करणाऱ्या लोकांशी कमी आहे. पण वायु प्रदूषण याचं मोठं कारण आहे.
रिसर्चमधून समोर आलं की, २०२२ मध्ये जगभरात जेवढ्या कॅन्सरच्या केसेस समोर आल्या होत्या, त्यात ५३-७० टक्के असे लोक होते, ज्यांनी कधीच धुम्रपान केलं नाही. लॅन्सेटच्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, लंग कॅन्सरनं होणाऱ्या एकूण मृत्यूंमध्ये धुम्रपान न करणाऱ्यांचं स्थान पाचवं आहे. आशियाई देशात ही समस्या वेगानं वाढत आहे. महिला सगळ्यात जास्त प्रभावित होत आहेत. २०२२ मध्ये साधारण ८० हजार महिला ज्यांना लंग कॅन्सर होता, त्यांचा थेट संबंध वायु प्रदूषणासोबत आढळून आलं.
वैज्ञानिकांचं मत आहे की, लंग कॅन्सरच्या वाढत्या केसेससाठी वायु प्रदूषण मुख्य कारण आहे. खासकरून पीएम २.५ सारखे घातक कण फुप्फुसांमध्ये जाऊन खोलवर सेल्सचं नुकसान करतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
आयएआरसी वैज्ञानिक फ्रेडी ब्रे यांनी सांगितलं की, 'आज लंग कॅन्सरच्या ज्या केसेस वाढत आहेत, त्याचं मुख्य कारण धुम्रपानाच्या बदलत्या सवयी आणि वायु प्रदूषण आहे. जर स्थितीपासून बचाव करायचा असेल तर सरकारनं तंबाखू नियंत्रण आणि वायु प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी योजना केल्या पाहिजे.