शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला म्हणजे धोक्याची घंटा! असू शकतो 'हा' गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 4:19 PM

वरवर साधी वाटणारी लक्षणंही काहीवेळा कर्करोगाची असू शकतात. त्यामुळे आजाराचं लवकर निदान होत नाही. यामुळेच आजार गंभीर स्वरूपापर्यंत पोहोचतो आणि जीवाला धोका निर्माण होतो.

कर्करोग (Cancer) हा काही असाध्य रोगांपैकी एक आहे. कर्करोगाच्या काही प्रकारांमध्ये औषधांनी धोका कमी होऊ शकतो. मात्र आजही रुग्ण दगावण्याचं प्रमाण या आजारात पुष्कळ आहे. वरवर साधी वाटणारी लक्षणंही काहीवेळा कर्करोगाची असू शकतात. त्यामुळे आजाराचं लवकर निदान होत नाही. यामुळेच आजार गंभीर स्वरूपापर्यंत पोहोचतो आणि जीवाला धोका निर्माण होतो.

वाढतं प्रदूषण, तंबाखु-सिगारेटचं व्यसन यामुळे सध्या फुफ्फुसाचा कर्करोग (Lungs Cancer) होण्याचं प्रमाण वाढलंय. खोकला (Cough) हे या आजाराचं एक प्रमुख लक्षण आहे. वारंवार खोकला होणं, दोन-तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला येत राहणं अशी लक्षणं असतील, तर डॉक्टरांशी चर्चा करणं आवश्यक असतं. टीव्ही 9 हिंदीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

फुफ्फुसाच्या कर्करोगाची काही लक्षणं (Symptoms) सुरुवातीला दिसतात, मात्र अनेक रुग्ण त्याकडे कानाडोळा करतात. यामुळे हा आजार जीवघेणा बनतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. गेल्या काही वर्षांत फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलं असल्याचं फोर्टिस अ‍ॅस्कॉर्ट्स रुग्णालयाचे संचालक आणि पल्मनॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. रविशेखर झा यांचं म्हणणं आहे. चाळीशीच्या आतल्या रुग्णांमध्येही हा कर्करोग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. बहुतेकवेळा कर्करोग गंभीर झाल्यावरच त्याचं निदान होतं आहे, ही चिंतेची गोष्ट आहे. यामुळे त्यावर औषधोपचार (Medications) करणं कठीण होतं. पुरुषांमध्ये या कर्करोगाचं प्रमाण जास्त असल्याचं आढळतं, असं डॉ. झा यांचं म्हणणं आहे.

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचं एक प्रमुख लक्षण आहे, मात्र नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात, असं वरिष्ठ फिजिशियन डॉ. कवलजितसिंग यांनी सांगितलं. अशावेळी एखाद्या रुग्णाला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असेल, तर डॉक्टरांना दाखवून (Longer Cough Symptoms Should Be Checked) औषधोपचार सुरू केले पाहिजेत. यामुळे कर्करोगाचा धोका टाळता येतो. तसंच क्षयरोगासारख्या गंभीर आजाराचंही यामुळे निदान होऊ शकतं.

फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं

  • छातीत दुखणं.
  • वजन झपाट्यानं कमी होणं.
  • दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला राहणं.
  • खोकल्याची उबळ येऊन त्यात रक्त पडणं.

कर्करोगाचं प्रमुख कारण धूम्रपानधूम्रपान (Smoking) करण्याची सवय फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमुख कारण असतं. मात्र आता वायू प्रदुषणामुळेही फुफ्फुसाचा कर्करोग होत असल्याचं समोर आलंय. प्रदूषित हवा, औद्योगिक प्रदूषण, चुकीची आहार पद्धती, हुक्का, विडी यामुळे हा कर्करोग होण्याचा धोका असतो. त्यामुळे संतुलित व पौष्टिक आहार घेणं, घरातली हवा शुद्ध करण्यासाठी एअर प्युरिफायरचा वापर करणं, धूम्रपान न करणं, घरात, आजूबाजूला झाडं लावणं हे काही उपाय करता येऊ शकतात.

त्याशिवाय बाहेर जाताना मास्क वापरणं ही सवय खूप हितकारक ठरू शकते. प्रत्येकानं दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी करावी. त्यामुळेही आजाराचं निदान सुरुवातीच्या टप्प्यात होऊ शकतं व आजार बरा होण्याची शक्यता वाढते. चांगली जीवनशैली अंगिकारणं हा आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाय असतो. तसंच योग्य व वेळेवर निदान हा कोणताही आजार लवकर बरा करण्यासाठीची महत्त्वाची पायरी असते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स