(Image Credit : CANCERactive)
Lymphoma कॅन्सरने सध्या जगभरामध्ये वेगाने पसरत आहे. हा एक घातक कॅन्सर आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनुसार, 2013च्या आकडेवारीनुसार, लिम्फोमा कॅन्सरची 69,740 प्रकरणं समोर आली आहेत. लिम्फोमा एक ब्लड कॅन्सर आहे. जर योग्य वेळ याची लक्षणं लक्षात घेतली तर या आजाराच्या गंभीर परिणामांपासून बचाव करणं शक्य होतं. जाणून घेऊया या आजाराबाबत सविस्तर...
काय आहे लिम्फोमा?
लिम्फोमा कॅन्सर सर्वात आधी इम्यूनिटी सिस्टमच्या लिम्फोसाइट सेल्समध्ये पसरतो. हे सेल्स म्हणजेच पेशी इन्फेक्शनसोबत लढतात आणि शरीराची रोगप्रतिकार क्षमता मजबुत करतात. या पेशी लिम्फ नोड्स, बोन मॅरो, स्प्लीन आणि थायमसमध्ये उपस्थित असतात. लिम्फोमा कॅन्सर शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम करतो. यामध्ये लिम्फोसाइट्स पूर्णपणे बदलतात आणि वेगाने वाढतात.
दोन प्रकारचा असतो लिम्फोमा
लिम्फोमा कॅन्सरचे दोन प्रकार आढळून येतात. यातील पहिला प्रकार म्हणजे, नॉन हॉजकिन (Non-Hodgkin) आणि हॉजकिन (Hodgkin). या दोन्ही कॅन्सरमध्ये वेगवेगळे लिम्फोसाइट्सचा समावेश होतो. याव्यतिरिक्त या दोन्ही लिम्फोमाची ग्रोथ वेगवेगळ्या प्रकारचे असतात.
दरम्यान लिम्फोमा आणि ल्यूकेमिया हे दोन भिन्न प्रकार आहेत. दोन्ही ब्लॅड कॅन्सरचेच प्रकार आहेत. परंतु, जिथे लिम्फोमा लिम्फोसाइट्स असतात. तिथेच ल्यूकेमिया बोन मॅरोमध्ये असलेल्या रक्त पेशींमध्ये होतो.
या व्यक्तींना असतो लिम्फोमाचा धोका...
1. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हॉजकिन लिम्फोमा 15 ते 40 वर्ष किंवा 55 पेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना होतो.
2. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या व्यक्ती एचआयव्हीने पीडित असतात, किंवा त्यांचं ऑर्गन ट्रांसप्लांट झालेलं असतं त्यांना लिम्फोमा होण्याचा धोका अधिक असतो. कारण या व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती कमी असते.
3. याव्यतिरिक्त जर तुमच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती लिम्फोमाने पीडित असेल तरिदेखी कॅन्सर होऊ शकतो.
लिम्फोमाची लक्षणं :
लिम्फोमाची लक्षणं सहज ओळखणं अजिबात शक्य नसतं. परंतु अशी काही लक्षणं आहेत ज्यांच्या मदतीने याबाबत जाणून घेणं शक्य होतं. जाणून घेऊया लिम्फोमाची लक्षणं...
- लिम्फ नोड्समध्ये सूज येणं
- खोकला आणि श्वास घेण्यासाठी त्रास होणं किंवा श्वास गुदमरणं
- ताप
- रात्री झोपल्यावर जास्त घाम येणं
- थकवा आणि अचानक वजन कमी होणं
- खाज आणि जळजळ होणं
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणाताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.