भारतातल्या अनेक लोकांना जीवनशैलीशी निगडीत आजार मोठ्या प्रमाणात आहेत. तसंच वाढता कामाचा ताण आणि सतत उद्भवत असणारे लहान मोठ्या समस्या यांमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना मानसीक आजार सतावत आहेत. तसंच लोकांच्या नकळतपणे त्यांच्या मेदूंवर तसंच शरीरावर जीवघेण्या आजारांचं आक्रमण होत आहे. त्यातीलच एक म्हणजे हायपरटेंशन आणि रक्तदाबाच्या संबंधीत असलेले आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचा नकारात्मक परीणाम हृदयावर होत असतो. यामुळे जीवाला धोका उद्भवून गंभीर स्वरूपाचा आजार होण्याची शक्यता असते.
मद्रास येथे संशोधकांनी केलेल्या संशोधनात एक गोष्ट समोर आली आहे. या अभ्यासासाठी आयआयटीच्या संधोधकांनी उत्तर आणि दक्षिण भारतातून जवळपास २५०० लोकांना सामील करून घेतले होते. यात हेल्दी लोकांबरोबरच असे सुध्दा लोकं सामील होते. ज्यांना हायपरटेंशनची समस्या आधीपासूनच होती. यात असे समोर आले की जर कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात MMP7 एन्जाईममध्ये म्यूटेशन असेल तर त्या व्यक्तीला हायपरटेंशन होण्याचा धोका जास्त असतो. तुलनेने ज्या व्यक्तीच्या शरीराच म्यूटेशन झाले नसेल त्यांना हायपरटेंशनचा धोका कमी असतो.
या अभ्यासासाठी अनेक फार्मा कंपनीजची मदत करु शकतात. कारण जेव्हा ते डायग्नोसिस विकसीत करतील तेव्हा त्यांना कोणत्या लोकांमध्ये हायपर टेंशनचे प्रमाण अधिक आहे. हे समजण्यास मदत होईल. या व्यतिरीक्त गेल्या अनेक वर्षापासून काही कंपनीज अशा औषधांना तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्यामुळे शरीरातील MMP7 ची पातळी कमी केली जाऊ शकते. आणि म्यूटेशन होण्यापासून थांबवता येऊ शकते. MM7 मुळे शरीरातील कार्डीओवॅस्क्यूलर आजार तसंच कॅन्सरचा सुद्धा धोका असू शकतो.