Magnesium Deficiency May Leads To Type 2 Diabetes: डायबिटीज एक फारच गंभीर आजार आहे. कारण जगाभरातील वैज्ञानिक आजपर्यंत यावर उपाय शोधू शकलेले नाहीत. त्यामुळे डायबिटीस होण्याआधीच रोखला जाणं गरजेचं आहे. सामान्यपणे हा आजार चुकीचा आहार आणि चुकीच्या जीवनशैलीमध्ये गडबड झाल्याने होतो. यामुळे वेळीच सावध होणं फार आवश्यक आहे. अनेक रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे डायबिटीसचा धोका वाढतो.
आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी इतर तत्वांसोबच मॅग्नेशिअमची गरज पडते. त्यामुळे शरीरात याची कमतरता होऊ देऊ नका. चला जाणून घेऊ शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता झाल्यावर काय होतं.
मॅग्नेशिअम एक महत्वाचं मिनरल आहे जे आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या केमिकल रिअॅक्शनमध्ये महत्वाची भूमिका बजावतं. ज्यामुळे शरीर फीट आणि निरोगी ठेवण्यास मदत मिळते. हे मिनरल मेंटल हेल्थसाठीही तेवढंच महत्वाचं आहे.
प्रसिद्ध डाइटीशियन आयुषी यादव (Ayushi Yadav) यांनी सांगितलं की, मॅग्नेशिअम आपल्या शरीरात ब्लड शुगर लेव्हल मेंटेन ठेवण्यास मदत करतं. याची कमतरता झाली तर डायबिटीसचा धोका वाढू शकतो. त्याशिवाय हार्ट डिजीज, कमजोरी, थकवा, मसल टेंशन, कमजोर शरीरसारख्या समस्याही होऊ शकतात.
कशातून मिळतं मॅग्नेशिअम?
-डार्क चॉकलेट
-नट्स
-केळी
-सीड्स
- हिरव्या पालेभाज्या
-सोयाबीन
-एवोकाडो
-दही
-स्ट्रॉबेरी
-अंजीर
-होल ग्रेन