कोरोना विषाणूनं गेल्या सहा महिन्यांपासून जगभरात थैमान घातलं आहे. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने ICMR पहिल्या राष्ट्रीय सिरो सर्व्हे अहवाल जारी केला होता. त्यातून सुमारे ६४ लाख लोकांना कोरोनाचा संक्रमणाचा सामना करावा लागत असल्याचं दिसून आलं. ज्या भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. या ठिकाणीही सर्वाधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रत्यक्षात असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त कोरोना रुग्ण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सिरो सर्व्हेचा पहिला रिपोर्ट आल्यानंतर आता दुसऱ्या अहवालाच्या प्रतिक्षा आहे. साधारणपणे सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला ही आकडेवारी समोर येईल.
सध्या महाराष्ट्रात २० हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. १२ सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, दिवसभरात २२,०८४ नवे रुग्ण आढळले. तर ३९१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही १०,३७,७६५ एवढी झाली आहे. तर मृत्यूसंख्या २९,११५ एवढी झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे होती. सध्या मुंबई, पुण्यातच नाही तर आता ग्रामीण भागातही कोरोना पसरू लागला आहे. रुग्णसंख्या वाढण्यामागे पूर्ववत झालेले व्यवहार, वाढची गर्दी, लोकांचा निष्काळजीपणा , मास्कचा वापर न करणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणं ही मुख्य कारणं असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. पूर्ण भारतात सध्या ६०लाखांहून आधिक रुग्ण असून महाराष्ट्रातच यातले 10 लाखांवर कोरोना रुग्ण आहेत. जवळपास ७५ हजार रुग्णांचा मृत्यू देखील देशात झाला आहे.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, भारतात रुग्णसंख्या जास्त असली तरीदेखील मृत्यूदर सर्वात कमी आहे. त्यामुळे जगभरात सर्वात जास्त मृत्यू झालेल्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर असला तरीदेखील एकूण रुग्णांच्या तुलनेत भारतात मृत्यूदर आटोक्यात आहे, असं आकडेवारी सांगते. ही आकडेवारी चुकीची असून अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था व्यवस्थित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर होत नाहीत. त्यामुळे अनेकांचा मृत्यू कशामुळे झाला आहे. हे समोर येत नाही.अनेक रुग्णांना वेळेत सेवा मिळत नसून यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी कोरोनाबाबत दिलेली कल्पना आणि सिरो सर्व्हेचा पहिला रिपोर्ट यानंतरच्या दुसरा सिरो सर्व्हेच्या रिपोर्टची आकडेवारी भीषण असू शकते.
२०२०-२१ मध्ये १०० कोटी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचणार; रशियाचा दावा
संपूर्ण जगभरातील लोक कोरोना लसीच्या प्रतिक्षेत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या २ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे. रशियाात कोरोना लसीचे डोज नागरिकांना देण्यास सुरूवात झाली आहे. जगातली पहिली वॅक्सिन स्पुतनिक व्ही लस पहिली टप्प्यातील लसीकरणात नागरिकांना लस दिली जाणार आहे. एका रिपोर्टनुसार रशियानं घोषणा केली आहे की २०२०-२१ मध्ये एक बिलियन म्हणजेच १०० कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण केले जाणार आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सनं इंटरफॅक्सवृत्त संस्थेच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. या लसीबाबत अधिक माहिती तुम्हाला सांगणार आहोत.
रशियातील आरडीआयएफनं ब्राजीलसह इतर देशांमध्ये लसीच्या निर्यात करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या व्यतिरिक्त कजाकिस्तानसोबतही करार करण्यात आला आहे. सुरुवातीला २० लाखपेक्षा अधिक लसीचे खुराक खरेदी करण्यासाठी तयार असून नंतर ५० लाख डोज मागवण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार भारतात रशियन लसीचे ३० कोटी डोज उत्पादित केले जाणार आहेत. या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अजूनही पूर्ण झालेली नाही. या महिन्यात या लसीची चाचणी भारतात होणार आहे. रशियनन डायरेक्टर इनवेस्टमेंट फंडाचे सीईओ किरिल दिमित्रिव यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतासह संयुक्त अरब, सौदी अरब, फिलीपींस आणि ब्राजिलमध्ये या महिन्यापासून चाचणीला सुरूवात होणार आहे.
ब्लादिमीर पुतिन यांनी ११ ऑगस्टला स्पुतनिक व्ही ही लस लॉन्च केली होती. याशिवाय या लसीच्या परिणामकारकतेबाबतही सांगण्यात आले होते. ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असून त्यांनी आपल्या मुलीलाही ही लस दिल्याचा दावा केला होता. ही लस मॉस्कोतील गमलेया रिसर्च इंन्स्टिट्यूटनं विकसित केली आहे. वैद्यकिय नियतकालिक लेसेंटमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार सुरूवातीच्या ट्रायल दरम्यान ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. ही लस घेतल्यानंतर स्वयंसेवकांच्या शरीरात एंटीबॉडीज तयार झाल्या आल्या.
हे पण वाचा-
अरे व्वा! इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतोय मास्कचा वापर; शास्त्रज्ञांचा दावा
खुशखबर! २०२०-२१ मध्ये १०० कोटी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचणार; रशियाचा दावा