परदेशात एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीमध्ये 'सुपर गोनोरिया' चा एक नवा स्ट्रेन आढळून आला आहे. वैज्ञानिकांनुसार, नव्या स्ट्रेनवर इन्फेक्शन ठीक करणाऱ्या अॅंटीबायोटिक्सचाही काही प्रभाव होत नाहीये. ही दुसरी वेळ आहे जेव्हा सुपर गोनोरिया नावाचा हा स्ट्रेन डिटेक्ट झाला. याआधी 2018 मध्ये बऱ्याच देशांमध्ये हा स्ट्रेन आढळून आला होता.
रिपोर्टनुसार, या व्यक्तीने एप्रिल 2022 मध्ये कंबोडियातील एका सेक्स वर्करसोबत विना प्रोटेक्शन शारीरिक संबंध ठेवले होते. यानंतर 5 दिवसांनी व्यक्तीला यूरिन पास करताना प्रायव्हेट पार्टमध्ये वेदनेची समस्या होऊ लागली होती.
व्यक्तीमध्ये जो स्ट्रेन आढळून आला आहे त्यावर एजिथ्रोमाइसिनचा काहीच प्रभाव होत नाहीये. एजिथ्रोमायसिन सामान्यपणे गोनोरियाच्या उपाचारासाठी वापरली जाणारी पहिलं अॅंटीबायोटिक औषध आहे. पण या स्ट्रेनवर कोणत्याही अॅंटीबायोटिकचा काहीच असर झाला नाही.
सीडीसीने या केसबाबत आपल्या वेबसाइटवर लिहिलं की, शारीरिक संबंध ठेवताना प्रोटेक्शनचा वापर करणं आणि संक्रमित व्यक्तीसोबत संबंध न ठेवणं याने गोनोरिया किंवा त्याच्या स्ट्रेनचा धोका कमी केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊ गोनोरिया, त्याचे कारण आणि लक्षणांबाबत...
काय आहे गोनोरिया?
गोनोरिया एक लैंगिक संक्रमण आहे जे एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत जातं. पुरूष आणि महिला दोघांनाही हे संक्रमण होऊ शकतं. गोनोरिया सामान्यपणे मूत्रमार्ग, मलाशय आणि गळ्याला प्रभावित करतो. हा महिलांच्या गर्भाशय किंवा ग्रीवालाही प्रभावित करतो. गोनोरिया नेहमीच व्हजायनल, ओरल किंवा एनल सेक्सच्या माध्यमातून पसरतो. संक्रमित आईतून मुलांमध्येही हे संक्रमण पसरू शकतं.
गोनोरियाची लक्षणं
जास्तीत जास्त केसेसमध्ये गोनोरिया इन्फेक्शनची काहीच लक्षणे दिसत नाहीत. पण याची लक्षण शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर बघायला मिळू शकतात. पण सामान्यपणे याची लक्षणं प्रायव्हेट पार्टमध्ये दिसतात.
पुरूषांमध्ये दिसणारी लक्षणं
- यूरिन पास करताना वेदना
- प्रायव्हेट पार्टमधून पस यासारखा डिस्चार्ज
- टेस्टिकल्सच्या आजूबाजूला वेदना किंवा सूज
महिलांमध्ये दिसणारी लक्षण
व्हजायनल डिस्चार्ज फार जास्त होणं
यूरिन पास करताना वेदना
इंटरकोर्स दरम्यान व्हजायनल ब्लीडिंग
पोट आणि पेल्विक फ्लोरमध्ये वेदना
गोरोनियाची कारणे
25 वर्षापेक्षा कमी वयाच्या महिला ज्या सेक्शुअली अॅक्टिव असतात आणि पुरूष ज्यांचे दुसऱ्या पुरूषांसोबत संबंध आहेत, त्यांना गोनोरियाचा धोका फार जास्त असतो.
- एखाद्या नव्या व्यक्तीसोबत संबंध ठेवणे
- अशा व्यक्तीसोबत संबंध ठेवणे ज्यांचे आणखीही काही पार्टनर्स आहेत
- एकापेक्षा जास्त लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवणे