WHO आणि सर्वच देशातील शासनाने दिलेल्या सुचनांनुसार स्वच्छतेविषयक नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. कारण कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच ठिकाणी स्वच्छता असणं गरजेचं आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता तेलंगणातील एका व्यक्तीने विशेष मशिन तयार केली आहे. कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी ही मशिन फायदेशीर ठरणार आहे. नक्की या मशिनचं काम कसं असणार आहे, याबाबत आम्ही माहिती देणार आहोत.
याविषयी केंद्रिय मंत्र्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसविरुध्द लढण्यासाठी तेलंगणामधील एका व्यक्तीने एक मशिन तयार केली आहे. या मशिनला पायाने ऑपरेट करता येईल. स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी ही मशिन फायदेशीर ठरणार आहेत. ही मशीन तयार करणाऱ्या व्यक्तीचं नाव मुप्पारपु राजू आहे. हा व्यक्ती तेलंगणाच्या वारंगल शहरात राहतो. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी नवीन पद्धती विकसीत करण्यासाठी नॅशनल इनोवेशन फाउंडेशनद्वारे Covid19 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर ही मशीन तयार करण्यात आली.
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी हात धुणं खूप महत्वाचे आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री यांनी या मशिनबाबत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये यांनी सांगितलं की, सध्याच्या स्थितीत असे कॉन्टॅक्टलेस डिव्हाईस तयार होण्याची खूप गरज आहे. मशीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादनु कधी सुरू करण्यात येईल याबाबत माहिती मिळालेली नाही. पण या मशिनच्या वापरामुळे सोशल डिस्टेंसिंगचं पालन केलं जाईल.
तसंच हे मशिन वापरण्यासाठी हातांनी स्पर्श करायची गरज नसल्यामुळे संसर्ग टाळता येऊ शकतो. कारण या मशिनमध्ये पाणी येण्यासाठी नळाला हात लावण्याची गरज नाही पायाने खाली असलेले बटन प्रेस केल्यास आपोआप हातावर पाणी पडेल. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस भारतात वाढत चालला आहे. म्हणून खबरदारी बाळगणं गरजेचं आहे.
CoronaVirus: धक्कादायक! जास्तवेळ मास्कचा वापर करणं ठरू शकतं जीवघेणं? जाणून घ्या सत्य
CoronaVirus News : २ हजार औषधांच्या चाचणीनंतर आता ३ नवी औषधं कोरोनाला हरवणार