आरोग्याबाबत सतत काहीना काही वेगवेगळ्या आश्चर्यकारक घटना समोर येत असतात. कधी कुणाच्या पार्श्वभागात अनेक वर्षांनी पिन सापडतात, तर कधी कधी दातांची कवळी कुणाच्या घशात अडकलेली ऐकायला मिळते. अशीच एक आश्चर्यकारक स्थिती समोर आली आहे. जमालुद्दीन कुशीनगरचे राहणारे आहेत. पोटात दुखत असल्याने ते गोरखपूरला उपचारासाठी डॉक्टरांकडे गेले. तेव्हा त्यांना समजलं की, त्यांच्या पोटातील काही अवयव उलट-पुलट आहेत. म्हणजे लिव्हर आणि गॉल ब्लॅडर डावीकडे आहेत.
Bariatric Laporoscopic Surgeon डॉ. शशी दीक्षित तर जमालुद्दीनचे रिपोर्ट पाहून हैराण झाले. त्यांनी सांगितले की, अशाप्रकारच्या स्थितीला Situs Inversus असं म्हणतात. यात शरीराचे महत्वाचे अंग उलट्या दिशेला असतात. अनेकदा तर व्यक्तीला आयुष्यभर हे कळत नाही की, त्याला Situs Inversus आहे.
हा आजार जगभरातील वेगवेगळ्या लोकप्रिय लोकांना सुद्धा आहे. लोकप्रिय गायक Enrique Iglesias, कॅनडा-अमेरिकेतील अभिनेत्री Catherine O'Hara, अमेरिकन गायक Donny Osmond यांनाही Situs Inversus आहे.
जमालुद्दीनचं पोट दुखण्याचं कारण त्याच्या गॉल ब्लॅडरमधील स्टोन हे होतं. Situs Inversus मुळे डॉक्टरांना त्याची सर्जरी करण्यात फारच अडचण गेली. सर्जरी Three Dimensional Laparoscopic या मशीनने करण्यात आली.