आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. उन्हाळ्यात आंबा खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. आंबे खाण्यापूर्वी पाण्यात टाकावेत हे आपण लहानपणापासून पाहत आणि ऐकत आलो आहोत. आंबा खाण्यापूर्वी १-२ तास पाण्यात ठेवला जातो. आंबे पाण्यात बुडवून ठेवल्यानं त्यातील उष्णता कमी होते असं म्हटलं जातं.
आंब्यामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले गेले आहे. त्यात जीवनसत्त्वे A, C, B6, फायबर, फोलेट, कॉपर, कार्बोहायड्रेट्स, अँटिऑक्सिडंट्स असतात. याशिवाय हे फॅट फ्री, सोडियम फ्री आणि कोलेस्ट्रॉल फ्री आहे.
आंबे पाण्यात का ठेवतात?आंबे पाण्यात भिजवण्याचा मंत्र फार जुना आहे. असं केल्यानं अतिरिक्त फायटिक ऍसिड बाहेर काढण्यास मदत होते. हे शरीरात उष्णता निर्माण होते. टरबूज, आंबा आणि पपई ही फळे शरीरात उष्णता निर्माण करतात, असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. त्याच्या अति उष्णतेमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे डायरिया आणि स्किन इन्फेक्शनची समस्या उद्भवू शकते. अशावेळी फळे पाण्यात भिजवल्याने नैसर्गिक उष्णता (प्रभाव) कमी होतो. अशा परिस्थितीत त्यांचं सेवन शरीरासाठी सुरक्षित मानलं जातं. त्यामुळे आंबा खाण्यापूर्वी किमान १-२ तास पाण्यात बुडवून ठेवावे. जर हे शक्य नसेल तर किमान २५-३० मिनिटं तरी आंबे पाण्यात ठेवावे असं म्हटलं जातं.
आंबा खाण्याची योग्य पद्धतआंबा खाण्याचा उत्तम उपाय म्हणजे तो कापून खाणे. पण काहींना आमरसही आवडतो. आयुर्वेदानुसार आंबा आणि अन्य फळांसह एकत्र कधीही खाऊ नयेत. आंबा, एवोकॅडो, खजूर इत्यादी गोड, पूर्ण पिकलेल्या फळांसोबतच दूध घ्यावं. जेव्हा तुम्ही पिकलेला आंबा दुधात मिसळून खाता तेव्हा ते वात आणि पित्त शांत करते. ते चवदार असण्यासोबतच पौष्टिक देखील आहे. अशा परिस्थितीत आता या कडक उन्हात मँगोशेकचा आस्वादही घेऊ शकता.