मसाल्याच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने समाविष्ट होणारी लवंग आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. लवंग एखाद्या पदार्थामध्ये टाकली की त्यामुळे पदार्थाला उत्तम सुगंध येतो. परंतु ही लवंग अनेक व्याधी आणि विकारांवर गुणकारी असते. यामध्ये असणारे अॅन्टी-ऑक्सिडंट आणि अॅन्टी-बॅक्टेरियल तत्वे आपल्याला सुदृढ बनवण्याचे काम करतात. लवंग ही नैसर्गिकरित्या गरम असते. त्यामुळे सर्दी खोकला झाल्यावर लवंग खाणे अथवा चहामध्ये लवंग टाकून घेणे फायदेशीर ठरते. असेच काही लवंग खाण्याचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त असणारे उपाय जाणून घेऊयात...
सायनस
नाकामध्ये जळजळ अथवा सायनसचा खूप त्रास होत असेल तर अशावेळी लवंगचा आहारामध्ये समावेश करावा. त्यामुळे सायनस आणि नाकाच्या इतर तक्रारींपासून आराम मिळतो.
चेहऱ्यावरील पुरळांवर गुणकारी
लवंगमध्ये अॅन्टी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. चेहऱ्यावरील डाग आणि पुरळ दूर करण्यासाठी लवंगाच्या तेलाचा उपयोग होतो. तसेच लंवगामुळे चेहऱ्यावरील पुरळ वाढत असतील तर ते रोखण्यासही मदत होते.
पचनक्रीया सुधारते
लवंगाच्या सेवनाने शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर पोटाच्या अनेक तक्रारी जसे गॅस, जळजळ, अपचन आणि उलट्या होणे यांसारख्या तक्रारींवर गुणकारी असते. तसेच लवंगाच्या सेवनाने अॅसिडिटीवरही आराम मिळतो.
दातदुखीवर फायदेशीर
दातदुखीवरही लवंग अत्यंत परिणामकारक ठरते. जर तुम्ही दातदुखीने त्रस्त आहात तर एक कापसाचा बोळा घेऊन त्यावर लंवंगाचे तेल घ्या आणि दुखत असलेल्या दातावर लावा. आराम मिळेल.
तोंडाची दुर्गँधी दूर करण्यास मदत
बऱ्याचदा बोलताना समोरच्याला आपल्या तोंडाचा दुर्गंध येतो. त्यासाठी लवंग अत्यंत फायदेशीर ठरते. लवंग तोंडात ठेवून जास्तीत जास्त वेळ चावल्याने तोंडातून येणारा दुर्गंधी दूर होतो आणि फ्रेश वाटते.
सांधेदुखीवर परिणामकारक
बऱ्याचदा वयस्कर व्यक्तिंना सांधेदुखीचा त्रासाला सामोरे जावे लागते. लवंगाचे तेले साध्यांवर लावल्याने सांधेदुखीचा त्रासही कमी होतो.