जगभरात जवळपास १ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर साडेपाच लाखाहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. ४ दिवसात कोरोनाचे १० लाखाहून अधिक रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे कोरोनाचं संकट जगावर आणखी तीव्र स्वरुपात पसरत असल्याचं दिसून येत आहे.
अशातच कोरोना व्हायरस संक्रमित ३५ वर्षाच्या महिला रुग्णाला ४ महिने १० दिवस हॉस्पिटलमध्येच राहावं लागलं होतं. १३० दिवसानंतर ब्रिटनमधील फातिमा ब्रिडल यांची प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना जनरल वार्डमध्ये शिफ्ट केले. फातिमा ब्रिटनमध्ये सर्वात जास्त वेळ आजारी राहणारी रुग्ण बनली आहे. १ महिन्याच्या ट्रीपनंतर मोरस्कोवरुन परतल्यानंतर फातिमा आजारी पडली होती. मार्चमध्ये तिच्या ५६ वर्षीय पतीमध्ये कोरोनाचे लक्षण आढळून आले होते.
खरतरं, एप्रिलच्या अखेरीस फातिमा कोरोना व्हायरसमधून मुक्त झाली होती. पण ती न्यूमोनियाने पीडित होती. कोरोना संक्रमणामुळे फातिमाच्या फुस्स्फुसांमध्ये गंभीर आजार झाला होता, आता त्यांचे फुस्स्फुस पूर्ण क्षमतेने काम करु शकत नाही. फातिमाला ब्रिटनमधील साऊंथपटन जनरल हॉस्पिटलला १२ मार्च रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल साडेतीन महिने या महिला रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.
पुन्हा जीवदान मिळाल्यानंतर फातिमाने नर्स आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत, हे सगळं स्वप्नासारखं वाटत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ब्रिटनेचे आरोग्य मंत्री मैट हैकॉक यांनीही फातिमा यांची प्रकृती स्थिर झाल्याने आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, या घटनेमुळे हे सिद्ध झालं की, तुम्हीही कोणीही असाल, ब्रिटनमधील राष्ट्रीय आरोग्य सेवा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी नेहमी कार्यरत असते असा विश्वास व्यक्त केला.
त्याचसोबत फातिमाचे पती ट्रेसी यांनी सांगितले की, फातिमाने वैद्यकीय चमत्कार दाखवला आहे. व्हेंटिलेटरवर इतका काळ राहिल्यानंतर त्यातून वाचणं हे असामान्य आहे. मला आता लवकरात लवकर तिला भेटण्याची इच्छा आहे, आता मी वाट पाहू शकत नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
रायगडावरील हत्ती तलाव १५० वर्षांनी भरला; छत्रपती संभाजीराजेंनी जलपूजन केलं अन् म्हणाले...
विश्व हिंदू सेनेचं आंदोलन की स्टटंबाजी?; नेपाळी सांगून ज्या युवकाचं मुंडन केलं, तो तर...
बेडसाठी हॉस्पिटलच्या माराव्या लागल्या चक्करा; मृत्यूनंतरही १७ तास मृतदेह ताटकळत ठेवला
नववधू कोरोना पॉझिटिव्ह निघाली; कुटुंबातील ९ जण बाधित तर ८६ जणांना क्वारंटाईन केलं