आपलं कम्प्युटर गरम होतं, हॅँग होतं तर ते आपण रिस्टार्ट करतो, त्यातल्या नको त्या फाईल्स उडवतो, स्पॅड डिलीट करतो पण आपल्या मेंदूचं काय? आपला मेंदू, मन सतत हजारो विचारांनी भरलेलं असतं. सगळा किचाट. त्यातून एक गोष्ट नीट होत नाही. अनेक गोष्टी आपण विसरतो, आणि काही तर मागेच पडतात. त्यातून अनेकांना नंतर डिमेन्शिया अर्थात विस्मरणाचा त्रास होऊ शकतो. पुढे अल्झायमर होण्याचीही शक्यता असते. त्यावर उपाय म्हणजे माइण्डफुलनेस मेडिटेशन.ध्यान धारणा केल्यानं मेंदूला विश्रांती आणि तजेला दोन्ही मिळू शकतो. त्यातून मेंदूची स्मरणशक्ती तर वाढतेच पण चित्त एकाग्र झाल्यानं काम पटापट आणि उत्तम होतात, त्याचा आनंद मिळतो असंही एक अभ्यास सांगतो.युनिव्हर्सटिी ऑफ वॉटरलू या विद्यापीठानं केलेल्या अभ्यासानुसार 25 मिनिटं माईण्डफुलनेस मेडिटेशन केल्यास आपल्या मेंदूचं विचारचक्र बदलतं. थिकिंग पॅटर्न बदलतात. इमोशलन रिस्पॉन्स आपण जे देतो ते बदलून योग्य रिस्पॉन्स देणं सुरु होतं. त्यातून डिमेन्शियासारखे आजारही टाळले जातात. मेंदूला कायम चित्त एकवटण्याची सवय लागते यासोबतच हठ योगचाही अभ्यास करण्याचा सल्ला हा अभ्यास देतो. त्यामुळे आपल्या मेंदूत साचलेला कचरा साफ करुन, मेंदूला तरतरी देणे, त्याची सजगता वाढवणे हे गरजेचे आहे.पाश्चिमात्य जगात सध्या या माइण्डफुलनेस मेडिटेशनची विशेष चर्चा आहे. सतत धावपळ, डोक्यात हजारो विचार, त्याचा ताण, शरीराच्या व्याधी, नातेसंबंध आणि यासह शेकडो गोष्टी एकाचवेळी करण्याची सवय यामुळे मेंदू शिणतो. आपण जी गोष्ट करतो त्या गोष्टीत आपलं लक्षच नसतं, आपलं चित्त भरकटलेलं असतं त्यातून जी कृती आपण करतो ती कशी केली याची संवेदनाही मेंदूर्पयत पोहचत नाही. त्यामुळे त्या कामात मेंदू नसतो, शिवाय त्याचा आनंदही मिळत नाही.हे सारं टाळायचं तर ध्यान करणं, ते शिकून घेणं, शांत बसणं, स्वतःवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.
25 मिनिटं ध्यान करा; डिमेन्शियाचा धोका टाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 1:20 PM
माईण्डफुलनेस मेडिटेशन केली तर डिमेन्शिया, अल्झायमर या आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.
ठळक मुद्देध्यान धारणा, श्वसनाचे प्रकार हे सारं मन शांत करण्यासाठी आवश्यक आहे, पण ते नियमित करायला हवं.