ध्यान धारणेने चित्त एकाग्र होते हे आपण सगळेच जाणतो . पण ती वाटते तेवढी सोपी प्रक्रिया नाही. त्यासाठी थोडी पूर्व तयारी करावी लागते. ती कशी करायची याची सविस्तर माहिती आणि ध्यान धारणेमुळे होणारे लाभ जाणून घेऊ
ध्यान:-
१. ध्यान आपल्याला मानसिक सशक्त बनवते, ज्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत प्रसन्न राहू शकतो.२. आपल्याला आंतरीक शांती प्राप्त होते आणि आसपासच्या परीस्थितीवर प्रभाव करू शकतो.३. भावनिक लवचिकता वाढते.४. प्रतिक्रिया व्यक्त करणे कमी होते. प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते.५. हा मनाला ताण-तणाव मुक्त कारण्याचा मार्ग आहे
शांत परिसर - शांत परिसरामध्ये ध्यान करणे योग्य. यामुळे अडथळे दूर होऊन, तुम्ही ध्यानामध्ये खोलवर जाऊ शकता.
नियमित ध्यान करा - दिवसातून दोनवेळा, सातत्याने ध्यान करणे उत्तम. यामुळेच प्रत्येक दिवसागणिक तुम्हाला ध्यानाचे सकारात्मक प्रभाव जाणवू लागतात.
साथीदारांसह ध्यान करा - आपल्या जवळच्या साथीदारांच्या सोबत समुहाने ध्यान करा, यामुळे तुमचे अनुभव सखोल बनतील, शिवाय तुम्हाला सातत्य ठेवणे मदतीचे होईल.
ध्यानापुर्वी हलके शारीरिक व्यायाम करा –यामुळे शरीरातील विविध अवयवांमधील ताण आणि तणाव निघून गेल्याने आरामदायी व्हाल आणि ध्यान आणखी आनंददायी बनेल.
विचारांचे निरीक्षण करा - विचारांना रोखण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना येऊ द्या. त्यामुळे ध्यान विनासायास बनेल.
घाई करू नका - दहा-पंधरा मिनिटांचे ध्यान होतेय नां पहा. डोळे उघडण्यासाठी घाई करू नका.