ब्रेकअप ही अशी गोष्ट आहे जी झाली की माणूस खुप भावूक होतो. ब्रेक अप नंतर फक्त महिलांना नाही पुरुषांनाही त्रास होतो. पण तुम्हाला माहित आहे का? पुरुषांमधला हा त्रास इतका वाढू शकतो की त्यानंतर त्यांना मानसिक आजारही होऊ शकतात.
एका अभ्यासात हे समोर आलं आहे की, ब्रेकअपनंतर पुरूषांमध्ये चिंता, डिप्रेशन आणि आत्महत्येचे विचार येतात. मानसिक आजारांचा धोका वाढतो. हा अभ्यास ‘सामाजिक विज्ञान आणि चिकित्सा- आरोग्य गुणवत्ता संशोधन’ मध्ये प्रकाशित झाला आहे. ज्यामध्ये ब्रेकअपनंतर पुरुषांच्या मानसिक स्थितीवर काय परिणाम होतो, याबाबत संशोधन करण्यात आलं.
संशोधनात हेही आढळलं कि, ज्या पुरूषांमध्ये बेक्रअपनंतर उदासीनता किंवा निराशा आली. ते राग, माफी, उदासीनता आणि लाज वाटण्यासारख्या भावनांचा सामना करण्यासाठी दारू आणि इतर अंमली पदार्थांचं सेवन करू लागले. कॅनडातील नर्सिंगचे यूबीसी प्रोफेसर आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. जॉन ओलिफ (Dr John Oliffe) म्हणाले, “ब्रेकअप (Breakup) झाल्यानंतर बहुतांश पुरुषांमध्ये मानसिक आजारांची लक्षणं दिसून आली. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर झाला.
यूबीसीच्या मेन्स हेल्थ रिसर्च प्रोग्राम (UBC’s Men’s Health Research Program) मध्ये डॉ. ओलिफ आणि त्यांच्या टीमने ब्रेकअप झालेल्या ४७ पुरुषांची मुलाखत घेतली. ज्यामध्ये समोर आलं की, ज्या पुरूषांना आपल्या नात्यांमध्ये संघर्ष करावा लागतो ते पुरूष समस्यांना कमी लेखतात, परिणामी नाती अजूनच ताणली जाऊन तुटतात.
दुसरीकडे यातील सकारात्मक पैलूंवर जेव्हा संशोधन करण्यात आलं. तेव्हा कळलं कि, ब्रेकअपनंतर पुरुष आपली मानसिक स्थिती नीट ठेवण्यासाठी स्वतःला अनेक गोष्टींत गुंतवून घेतात. जसं व्यायाम, वाचन आणि स्वतःची काळजी घेणं यासारखे प्रयत्न यात सामील होते. त्यामुळे ब्रेकअपचा परिणाम हा महिलांवरच होतो असं नाही. पुरूषांनाही ब्रेकअपनंतर मानसिक आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वेळीच आपल्या नात्याला वेळ द्या आणि जपा.