सध्या उन्हाळ्याचे दिवस असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. विदर्भासह अन्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या काळात रात्रीचं तापमान वाढलं तर पुरुषांमध्ये मृत्यूचा धोका अधिक असतो असं एका नव्या स्टडी रिपोर्टमधून समोर आलं आहे.
स्टडी रिपोर्टनुसार, सामान्य तापमानात केवळ १ टक्केही वाढ झाली तर ह्दयासंदर्भातील आजारामुळे मृत्यूचा धोका ४ पटीने वाढतो. बीएमजे ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या रिसर्चमध्ये म्हटलंय की, रात्रीचं तापमान वाढल्यामुळे मृत्यूचा धोका केवळ पुरुषांमध्येच दिसून येतो. महिलांवर त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. उष्माघात आणि ह्दयाचे रुग्णांची संख्या उन्हाळ्याच्या दिवसात वाढते. परंतु या रिपोर्टमध्ये कुठल्याही विशेष वयाच्या लोकांचा उल्लेख नाही. टोरंटो यूनिवर्सिटीच्या एका टीमने ६०-६९ वयोगटातील लोकांचा मृत्यू होत असल्याचं म्हटलं होतं.
या स्टडीप्रमाणे संशोधकांनी ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिक्सचे २००१ ते २०१५ या काळात जून-जुलैमध्ये ह्दयाशी संबंधित होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी गोळा केली होती. इग्लंडसारख्या देशात ही स्टडी केली होती. कारण या महिन्यात यूकेमध्ये सर्वात जास्त तापमान असते. वॉश्गिंटनच्या किंग काऊटीमधूनही आकडेवारी गोळा केली होती. या आकडेवारीनुसार, २००१ ते २०१५ या काळात ह्दयाशी संबंधित आजारामुळे ३९ हजार ९१२ लोकांचा मृत्यू झाला होता. तर किंग काऊटीमध्ये ४८८ लोकांचा मृत्यू झाला होता.
इंग्लंडसारख्या तापमानात १ डिग्री वाढ झाल्याने ६०-६४ वयोगटातील पुरुषांमध्ये मृत्यूचा धोका बळावला. याठिकाणी मृत्यूदर ३.१ टक्के इतका होता. त्यात वृद्ध आणि महिलांचा समावेश नव्हता. किंग काऊटीमध्येही ६५ आणि त्याहून कमी वयोगटातील पुरुषांना ह्दयाशी संबंधित आजारामुळे मृत्यूचा धोका ४.८ टक्के इतका होता. संशोधकांनी अलीकडे जारी केलेल्या रिपोर्टमध्ये चिंता दर्शवण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी तापमानात वाढ होत आहे. मृत्यूचा धोका जास्त असल्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
या लक्षणांना दुर्लक्ष करू नका
हृदयाशी संबंधित आजारात हृदयविकाराचा झटका किंवा अर्धांगवायूच्या झटक्यासारख्या घटना घडू शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की, रात्री घाम येणे, छातीत घट्टपणा येणे किंवा अस्वस्थता येणे ही लक्षणे हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. एका अहवालानुसार, इंग्लंडमध्ये दरवर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे सुमारे ८० हजार लोक रुग्णालयात जातात. त्यामुळे त्याच्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.