Breast cancer to Men : महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर फार कॉमन कॅन्सर आहे. याची सुरूवात तेव्हा होते जेव्हा कोशिका प्रमाणापेक्षा जास्त वाढू लागतात आणि त्यात ट्यूमर तयार होऊ लागतो. पण तुम्ही कधी ऐकलंय का की, पुरूषाना ब्रेस्ट कॅन्सर झाला? असं क्वचितच कुणी ऐकलं असेल. नुकतीच अशीच एक घटना समोर आली की, यूनायटेड किंगडमच्या कार्डिफमध्ये राहणारी एक पुरूष माइक रॉसिटर याला ब्रेस्ट कॅन्सर झाला.
निप्पलवरील गाठ दिसून येईपर्यंत त्याना या आजाराबाबत काहीच माहीत नव्हतं. काही दिवसांनी त्याना जेव्हा जाणवलं की, छातीत काहीतरी अजब होत आहे, तेव्हा त्यानी टेस्ट केली आणि त्याना समजलं की, त्याना ब्रेस्ट कॅन्सर आहे.
धावताना झाली जाणीव
जास्त धावताना त्वचा आणि कपड्यांमध्ये घर्षण झाल्याने निप्पल फाटतात ज्याला मेडिकल भाषेत रेड इलेवन, रावर्स निपल, बिग क्यूएस म्हटलं जातं. यात निप्पलमधून रक्त येऊ लागतं किंवा जखम विकसित होते. यासाठी मॅरेथॉन रनर्स व्हॅसलीन लावतात.
माइक रॉसिटरही 2014 मध्ये मॅरेथॉन ट्रेनिंग दरम्यान निप्पलवर व्हॅलसीन लावत होते तेव्हा त्यांना निप्पलवर गाठ दिसली. यानंतर ते घाबरले नाहीत, उलट शांत राहून लोकांकडे सल्ले घेतले. बायोप्सीनंतर त्याना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं समजलं. हा त्यांच्यासाठी धक्का होता, पण त्यांनी याबाबत आधी कधी ऐकलं नव्हतं.
पत्नीने दिली साथ
माइक म्हणाले की, सुदैवाने माझी पत्नी माझ्या सोबत होती आणि तिने मला लगेच सांगितलं की, मला ब्रेस्ट कॅन्सर आहे. खरं सांगायचं तर मला याची कल्पनाही नव्हती की, पुरूषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. मला माहीत आहे की, अजूनही 99 टक्के पुरूषांना हे माहीत नसेल की, त्यांनाही हा कॅन्सर होऊ शकतो.
माइक आता बरे झाले आहेत आणि पुरूषांना ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागरूक करतात. पुरूषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा मुख्य संकेत निप्पलच्या मागे गाठ, उलटे निप्पल, छातीवर पुरळ आणि बगलेत गाठ यांचा समावेश आहे. तसेच लोकांना कोणतीही चिंता असेल तर ते त्यांना टेस्टसाठी प्रोत्साहित करतात व हिंमती ठेवण्यास सांगतात.
माइक म्हणाले की, जर तुमच्या घरात कुणाला ब्रेस्ट कॅन्सर होता तर हे ध्यानात ठेवा की, तुम्हाला हा कॅन्सर होऊ शकतो. हे फक्त ब्रेस्ट कॅन्सरसाठीच नाही तर कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरबाबत लक्षात ठेवावं. याने तुम्ही वेळीच त्यावर उपचार घेऊन बरे होऊ शकाल.