(Image Credit : dailystarpost.com)
चीनसह जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून १५०० च्या आसपास लोकांचा या व्हायरसने जीव घेतला आहे तर त्यापेक्षा कितीतरी लोकांना याची लागण झाली आहे. जगभरात कोरोना व्हायरसमुळे भितीचं वातावरण आहे. दरम्यान वैज्ञानिक अजूनही कोरोना व्हायरसवर रिसर्च करत आहेत. कारण अजूनही ठोस उपाय वैज्ञानिकांच्या हाती लागलेला नाही.
चीनमध्ये जन्माला आलेल्या कोरोना व्हायरसचं जाळं आता दुसऱ्या देशांमध्येही झपाट्यानं पसरत आहेत. फ्रान्स, जर्मनी, जापान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मलेशिया, कंबोडिया, श्रीलंका, यूएई, साऊथ कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, कॅनडा आणि नेपाळमध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचे प्रकरणं समोर आले आहेत.
चीनमधील ज्या भागात कोरोना व्हायरसचा फटका बसलाय त्या वुहानमध्ये वैज्ञानिकांनी दोन रिसर्च केले आहेत. त्यातून समोर आले आहे की, कोरोना व्हायरसचा धोका महिलांपेक्षा पुरूषांना जास्त आहे.
वैज्ञानिकांनी चीनच्या वुहान विश्वविद्यालयातील हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांची टेस्ट केली. या रिसर्चमध्ये ५२ टक्के पुरूष कोरोना व्हायरसने संक्रमित आढळून आले. कोरोना संक्रमित हॉस्पिटलमध्ये भारतीय रूग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यावर हे कळून येतं की, एकूण दाखल करण्यात आलेल्या रूग्णांमध्ये ६८ टक्के पुरूष रूग्ण होते.
(Image Credit : gwpdigital.co.ke)
तज्ज्ञांनुसार, महिलांची इम्युनिटी पॉवर पुरूषांच्या तुलनेत जास्त असते. याआधी सुद्धा चीनमध्ये सार्स व्हायरसने थैमान घातलं होतं. तेव्हाही २० ते ५४ वर्षांच्याच महिला सार्सच्या शिकार झाल्या होत्या. तेच ५५ वर्षांपर्यंतच्या पुरूषांमध्ये सार्सची लक्षणे सर्वात जास्त आढळून आले होते.
कोरोना व्हायरसची लक्षणे
कोरोना व्हायरसने संक्रमित लोकांमध्ये सुरूवातील डोकेदुखी, नाक वाहणे, खोकला, घशात खवखव, ताप, कमजोरी येणे, शिंका येणे, अस्थमा बिघडणे आणि थकवा येणे ही लक्षणे दिसून येतात.