(Image Credit : unikdanlucu.com)
अनेक लोकांच्या मनात वेगवेगळ्या विचित्र भिती असतात ज्यावर कधी कधी विश्वासही बसत नाही. उलट प्रश्न पडतो की, असं कसं होऊ शकतं? याला फोबिया असं म्हटलं जातं. फोबियाला सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर एखाद्या गोष्टीबाबत मनात भिती असणे. काही लोकांना पाण्याची भिती असते, तर काही लोकांना उंची किंवा काही लोकांना पाल-झुरळाची भिती वाटते.
(Image Credit : steemit.com)
या फोबियाकडे लोक फारच सामान्यपणे बघतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. भिती मानवी स्वभावाचा एक गुण आहे. पण अनेकदा एखादी भिती सीमा पार करते आणि आपल्यावर ताबा मिळवते. हीच स्थिती पुढे फोबियाचं रूप घेते. तुम्हाला कधी एखाद्या सुंदर तरूणीला पाहून भिती वाटली का? तिला पाहून तुम्ही घामाघूम होऊन तुमचा थरकाप उडतो का? जर असं होत असेल तर तुम्हाला महिलांची भिती वाटण्याचा फोबिया आहे. चला जाणून घेऊ या अनोख्या फोबियाबाबत....
(Image Credit : selfevolution.com.au)
वीन्सट्राफोबिया म्हणजे सुंदर महिलांची भिती वाटणे. जास्तीत जास्त पुरूषांना सुंदर महिला पसंत असतात. पण काही असेही असतात ज्यांची सुंदर महिलांकडे बघण्याच्या किंवा त्यांच्यासोबत एकट्यात बोलण्याच्या विचारानेच हालत खराब होते. या फोबियाला कॅलिगनीफोबिया किंवा वीन्सट्राफोबिया असं म्हटलं जातं. या फोबियाने पीडित लोकांना सुंदर महिलांची इतकी भिती वाटते की, ते सुंदर महिलांना भेटण्याच्या किंवा बोलण्याच्या विचाराने अस्वस्थ होतात.
(Image Credit : lamezclues.com)
काय असतात लक्षणे?
भीतीने थरकाप उडणे
श्वासांचा त्रास
हृदयाचे ठोके वाढणे आणि पाय लटपटणे
पोटात गोळा येणे, मळमळ होणे, डोकेदुखी
श्वास घेताना धाप लागणे
घुसमटल्यासारखे होणे
अचानक रडायला येणे किंवा ओरडणे
भावनात्मक लक्षणे
कुठेतरी दूर पळून जावं वाटणे
मनात सतत जीव देण्याचा विचार येणे
आपला जीव गेलाय किंवा तुम्ही आंधळे झाला असं वाटणे
स्ट्रोक आल्यासारखं वाटणे
कधी कधी वेड्यासारखं वाटणे किंवा स्वत:वर विचारांवर कंट्रोल नसणे
हा आजार एक मानसिक समस्या आहे. त्यात घाबरण्यासारखं काही नाही. वरील लक्षणे दिसत असतील तर वेळीच मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन आणि काही थेरपीने तुम्ही ही समस्या दूर करू शकता.