Health Problems In Men After 30: पुरूष आपल्या आरोग्याकडे फारसं लक्षं देत नाहीत. ज्यामुळे त्यांना वयाच्या 30 ते 40 वयादरम्यान अनेक आजारांचा सामना करावा लागतो. अशात पुरूषांनी खूप सावध राहण्याची गरज आहे. जर पुरूषांना हेल्दी आणि फिट रहायचं असेल तर त्यांनी त्यांच्या लाइफस्टाईलवर लक्ष देण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, 35 वयात कोणत्या आजारांचा धोका राहतो.
हाडे कमजोर होणं -
तशी तर आजच्या काळात हाडे कमजोर होणं एक कॉमन समस्या बनली आहे. पण जे पुरूष योग्य प्रमाणात कॅल्शिअमचं सेवन करत नसतील तर त्यांची हाडं 30 वयापर्यंत कमजोर होऊ लागतात. या समस्येपासून वाचण्यासाठी तुम्ही तुमचं वजन कंट्रोल केलं पाहिजे. यासाठी पुरूषांनी रोज एक ग्लास दुधाचं सेवन करावं.
हार्ट डिजीज -
35 वयानंतर पुरूषांमध्ये हार्ट डिजीजचा धोका वाढत आहे. जर तुम्ही हेल्दी लाइफस्टाईल जगत नसाल तर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. ज्यामुळे बीपी वाढू शकतो. अशात जर तुम्हाला हार्ट डिजीजपासून बचाव करायचा असेल तर रोज एक्सरसाइज करा आणि तेलकट पदार्थ खाणं सोडा.
टक्कल पडण्याची समस्या -
अलिकडे 35 वयानंतर टक्कल पडण्याची समस्या कॉमन आहे. असं होण्याचं कारण की, बिजी लाइफस्टाईलमुळे पुरूष योग्य प्रमाणात प्रोटीन, आयर्न आणि व्हिटॅमिन्सचं सेवन करत नाहीत. ज्यामुळे त्यांना टक्कल पडण्याच्या समस्येच सामना करावा लागतो.
प्रोस्टेट कॅन्सरचा धोका -
35 वयात पुरूषांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो. ज्यामुळे रात्री जास्त वेळा लघवीला जावं लागणे. लघवी करताना जळजळ होणे इत्यादी समस्या सुरू होतात. अशात या समस्यांकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. समस्या आणखी वाढू शकते.