सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक आरोग्याच्या विविध समस्यांमुळे त्रस्त आहेत. अशातच हेल्दी लाइफस्टाइलसाठी अनेकजण फिटनेस फ्रिक झालेले दिसतात. सध्या सर्वांना सतावणारी कॉमन समस्या म्हणजे, सतत वाढणारं वजन किंवा लठ्ठपणा. अशातच वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकाचे प्रयत्न सुरू असतात. अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की, महिलांच्या तुलनेत पुरूषांचं वजन अधिक वेगाने कमी होतं. दोघांनीही समान वर्कआउट केलं किंवा सारखचं डाएट फॉलो केलं तरिदेखील पुरूषांचं वजन महिलांपेक्षा अधिक वेगाने कमी होतं. आता तुमच्याही मनात तोच प्रश्न असेल, खरचं असंचं होतं का? ही गोष्ट अत्यंत खरी आहे की, अनेक कारणांमुळे महिलांच्या तुलनेत पुरूष फार लवकर वजन कमी करतात.
संशोनध
एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, पुरूषांच्या तुलनेत महिला अधिक फूडी असतात. संशोधनानुसार, असंही आढळून आलं की, वजन कमी करणाऱ्या जवळपास 25 टक्के महिला दर अर्ध्या तासाने खाण्याबाबत विचार करतात. दुसरं कारण म्हणजे, पुरूषांच्या तुलनेत महिला पदार्थांबाबत किंवा खाण्याबाबत अधिक इमोशनल असतात.
दरम्यान, एका एका पुस्तकात प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनामध्ये दोघांच्या मेंदूच्या स्कॅन स्टडीबाबत सांगण्यात आले. या संशोधनामध्ये संशोधकांनी एका दिवसासाठी काही महिला आणि पुरूषांना उपाशी ठेवलं. त्यानंतर त्यांच्या समोर अनेक स्वादिष्ट पदार्थ ठेवण्यात आले. त्यानंतर असं आढळून आलं की, महिलांच्या तुलनेमध्ये पुरूष त्या खाण्याकडे कमी आकर्षित झाले. पुरूषांसाठी त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांबाबत होणाऱ्या इच्छा नियंत्रित करणं अगदी सोपं होतं.
महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये वेगाने मेटाबॉलिज्म वाढतं. एका पुरूषामध्ये असणारं मेटाबॉलिज्म हे त्याच्याच वजनाच्या आणि उंचीच्या महिलेच्या तुलनेत 5 ते 10 टक्क्यांनी जास्त असतं. यामागील कारण म्हणजे, पुरूषांमध्ये महिलांच्या तुलनेत पातळ स्नायू असतात. जे त्यांना अधिक कॅलरी बर्न करण्यासाठी मदत करतात. यामुळे पुरूषांना वजन कमी करणं अगदी सोपं जातं. याव्यतिरिक्त पुरूषांचं बॉडि स्ट्रक्चर महिलांपेक्षा अत्यंत वेगळं असतं. यामुळेही पुरूष महिलांच्या तुलनेत अधिक वेगाने वजन कमी करतात.
जर तुम्हीही वजन कमी करत असाल, तर त्यामध्ये कोणत्याही भवनिक कारणामुळे बाधा येऊ देऊ नका. कारण जर तुम्ही कोणत्याही कारणामुळे निराश असाल तर अनेकदा तुम्हाला आवडीच्या पदार्थांवर ताव मारण्याचा सल्ला देण्यात येतो. पण त्यामुळे तुमचा वजन कमी करण्याचा प्लॅन बिघडू शकतो. त्यामुळे तुमचं डाएट अगदी काटेकोरपणे पाळा. त्यामुळे लठ्ठपणासोबतच हेल्दी राहण्यासही मदत होइल.
टिप : वरील गोष्ट एका संशोधनातून सिद्ध झाली आहे. आम्ही यातून कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.