लोकांना फोनची अशी सवय लागली आहे की, सकाळी झोपेतून उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत याचा मोह आवरता येत नाही. इतकंच नाही तर बरेच लोक आता टॉयलेटला जाताना सुद्धा मोबाइल आपल्या सोबत नेतात. पण ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. डॉक्टरांनुसार, पुरूषांनी फोन सोबत घेऊन टॉयलेटला जाऊ नये. याचं एक कारण आहे जे जीवघेणं ठरू शकतं.
इंडियाना यूनिवर्सिटी हेल्थ डिपार्टमेंटच्या यूरोलॉजिस्ट डॉ. हेलेन बर्नी म्हणाल्या की, बॅक्टेरिया असलेले लघवीचे शिंतोडे टॉयलेट आणि सार्वजनिक टॉयलेटमध्ये अनेक दिवस राहतात. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, लघवीचे शिंतोडे तीन फूट अंतरापर्यंत जातात. अशात शक्यता अशीही आहे की, हे शिंतोडे तुमच्या फोनवरही येऊ शकतात. विष्ठा आणि लघवीमध्ये अनेक बॅक्टेरिया असतात किंवा व्हायरस असू शकतात. जेव्हा तुम्ही टॉयलेटमध्ये फ्लश करता, तेव्हा बॅक्टेरिया पसरतात. फिजिक्स ऑफ फ्लुइड्सच्या एका रिसर्चनुसार, टॉयलेटमध्ये फ्लश केल्यानंतर 57 टक्के बॅक्टेरियाचे कण 5.5 सेकंदात व्यक्तीपर्यंत पोहोचतात. हे अनेक दिवस राहतात आणि तुम्हाला आजारी करू शकतात.
65 टक्के लोक टॉयलेटमध्ये वापरतात फोन
डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, नॉर्डवीपीएनने 2021 मध्ये एका सर्वेक्षण केलं. त्यातून समोर आलं की, 9,800 वयस्कांपैकी 65 टक्के लोक आपला फोन टॉयलेटमध्ये वापरतात. एक चुकीची धारणा आहे की, दुसऱ्या हाताने फोन वापरल्याने कीटाणूचा प्रसार कमी होईल. डॉ. बर्नी यांनी सांगितलं की, जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही स्वच्छ आहात तर तुम्ही चुकीचा विचार करताय.