अनेक ठिकाणी महिलांच्या त्वचेच्या समस्यांवर विविध माहिती दिली जाते. महिलांच्या स्कीन केअरविषयी बऱ्याच बातम्या प्रसिद्ध होत असतात. मात्र, पुरुषांच्या स्किन केअरविषयी फार कमी माहिती प्रकाशित होते. अलीकडे तरुण मुले स्मार्ट दिसण्यासाठी भरपूर सौंदर्य प्रसाधने वापरत आहेत. स्किन केअरसाठी पुरुषही जागरूक असतात. आज आपण पुरुषांच्या स्किन केअर विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.
पुरुषही आता सलूनमध्ये जाऊन मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करू लागले आहेत. त्यामुळे त्वचेच्या काळजीबाबत सजग असलेल्या पुरुषांसाठी आम्ही अधिक चांगल्या टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुमची त्वचा दीर्घकाळ निरोगी ठेवता येते. (Men's skin care tips)
या टिप्स फॉलो करा
फेसवॉश दोनदा वापरापुरुषांना बाहेर जास्त मेहनत करावी लागते, त्यामुळे त्वचेवर धूळ, माती, सूर्यप्रकाशाचा प्रभाव जास्त प्रमाणात असतो. यामुळेच पुरुषांची त्वचा अधिक कडक होते. हा प्रभाव कमी करण्यासाठी किमान दोनदा फेसवॉशने चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेवरील धूळ आणि घाण तर दूर होईलच, पण त्वचेची छिद्रेही बंद होणार नाहीत.
स्क्रबकडक त्वचा घालवण्यासाठी मृत पेशी काढून टाकणे आवश्यक आहे. मृत पेशी काढण्यासाठी स्क्रबचा वापर करावा. यामुळे त्वचेचा मृत थर निघून जाईल आणि त्वचा मुलायम होईल.
मॉइश्चरायझर वापराबहुतेक पुरुषांना असे वाटते की, त्यांची त्वचा तेलकट आहे, म्हणून मॉइश्चरायझरची आवश्यकता नाही. तर बहुतेक पुरुषांची त्वचा कडक असते, त्यामुळे या त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चरायझेशन आवश्यक आहे.
टोनर वापरातेलकट त्वचा असल्यास टोनर वापरा. टोनर त्वचेतील सर्व अशुद्धी दूर करेल. यासोबतच टोनर पीएच लेव्हल संतुलित करतो. तसेच, त्यामुळे त्वचेतून अतिरिक्त तेल बाहेर पडत नाही.